esakal | नांदेडला बुधवारी ३५ अहवाल पॉझिटिव्ह एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

आजच्या ७२० अहवालापैकी ६७२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २२ हजार १६० एवढी झाली असून यातील २१ हजार ४९ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३२८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील नऊ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

नांदेडला बुधवारी ३५ अहवाल पॉझिटिव्ह एकाचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये सुधारणा होत आहे. बुधवारी (ता. २०) प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार ३५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३१ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका खासगी रुग्णालयातील बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

आजच्या ७२० अहवालापैकी ६७२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २२ हजार १६० एवढी झाली असून यातील २१ हजार ४९ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३२८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील नऊ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवारी (ता. २०) बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील महिला (वय ७२) यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ५८० व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा बोलबाला, ३०० ग्रामपंचायतीवर भगवा ​

घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के 

बुधवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन, महापालिकातंर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १८, जिल्हा रुग्णालय दोन, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत एक, देगलूर दोन, खासगी रुग्णालय पाच असे एकूण ३१ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के आहे. 

हेही वाचा- Breaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा विष्णुपुरीच्या रुग्णालयावर राेष ​

महापालिकातंर्गत गृहविलगीकरण १५०

आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात १८, नांदेड ग्रामीण दोन, अर्धापूर एक, देगलूर दोन, नायगाव एक, अदिलाबाद एक, भोकर दोन, कंधार पाच, परभणी एक, यवतमाळ एक, लोहा एक असे एकुण ३५ बाधित आढळले. जिल्ह्यात ३२८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १९, जिल्हा रुग्णालय १६, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) २५, मुखेड १६, महसूल कोविड केअर सेंटर १३, किनवट चार, देगलूर सात, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरण १५०, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५१ व खासगी रुग्णालयात २७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २२ हजार १६० 
एकुण बरे - २१ हजार ४९ 
एकुण मृत्यू - ५८० 
बुधवारी पॉझिटिव्ह - ३५ 
बुधवारी बरे - ३१ 
बुधवारी मृत्यू - एक 
प्रलंबित स्वॅब - ३९६ 
उपचार सुरू - ३२८ 
अतिगंभीर रुग्ण - नऊ 
 

loading image