नांदेड बाजार समितीत हळदीचा ऑनलाइन लिलाव सुरु

प्रमोद चौधरी
Sunday, 11 October 2020

नांदेडच्या कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये लावलेल्या लाॅटमध्ये किमान तीन हजार आठशे, कमाल पाच हजार ३१२ तर सरासरी चार हजार ८८७ रुपये दराप्रमाणे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळाला.

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात ‘इ-नान’ अंतर्गत ऑनलाइन लिलाव पद्धत सुरु झाली आहे. शनिवारी (ता. १० आॅक्टोबर) बाजारात ५०२ क्विंटल हळदचे ५२ लॉट लावण्यात आले होते. यात किमान तीन हजार आठशे, कमाल पाच हजार ३१२ तर सरासरी चार हजार ८८७ रुपये दराप्रमाणे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळाला.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. पूर्वी पारंपारीक बोली पद्धतीने लिलाव होत होता. यात शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाने ऑनलाइन लिलाव पद्धतीचा अंर्तभाव असलेल्या इ-नाम प्रणाली लागू केली. यामुळे नांदेड बाजार समितीने ता. ३० सप्टेंबरपासून ऑनलाइन लिलाव पद्धत सुरु झाली. अडत्याकडे विक्रीसाठी आणलेला शेतमाल लिलाव
ओटावर आणला जातो. त्यास बाजार समिती कर्मचाऱ्यांकडून लॉट क्रमांक देवून शेतकऱ्यांची नोंदणी होते. 

हेही वाचा - १४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू

दररोज सकाळी साडेअकरा ते दिड या वेळेत खरेदीदार मालाची पाहणी करुन दर लावतात. यानंतर दोन वाजता शेतकऱ्यांना त्याच्या मालाला मिळालेल्या दराबाबत मोबाइल संदेशाव्दारे अवगत केले जाते. त्यांची सहमती असेल तर माल विक्री केला जातो, अन्यथा त्यामालाची दुपारी तीन वाजता ऑनलाइन बोलीसाठी ठेवला जातो. दरम्यान शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात ५२ लॉट असलेली ५०२ क्विंटल हळद ऑनलाइन विक्रीसाठी लिलाव ओट्यावर मांडला होता. यास खरेदीदारांनी किमान तीन हजार आठशे, कमाल पाच हजार ३१२ तर सरासरी चार हजार ८८७ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली.

हे देखील वाचाच - परभणी महापालिकेला घरकुलांसाठी १३ कोटींचा निधी प्राप्त

शेतमालाचाही याचपद्धतीने लिलाव
शासनाच्या नियमानूसार नांदेड बाजार समितीत ‘इ-नाम’ प्रणालीनुसार हळदीचा ऑनलाइन लिलाव सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात इतर शेतमालाचाही याच पद्धतीने लिलाव केला जाइल.
- संभाजी पाटील पुयड, सभापती, नांदेड बाजार समिती, नांदेड.
 
हळदीला चांगला दर मिळाला
ऑनलाइन लिलाव पद्धतीमुळे आमच्या हळदीला चांगला दर मिळाला. यापुर्वी बोली पद्धतीत दर किती मिळाला, याची माहिती होत नव्हती. शनिवारी हळदीला चार हजार ६५२ दर मिळाला.
- किशोर पाटील, शेतकरी बारसगाव, ता. अर्धापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Auction Of Turmeric Started At Nanded Market Committee