esakal | आॅनलाईन शिक्षण : मुलांमध्ये वाढले कानाचे आजार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या माध्यमातून शिकविल्या जात असल्यामुळे लहान मुलांच्या मोबाईल वापरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी डोळ्यांसोबत कानाच्याही तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आॅनलाईन शिक्षण : मुलांमध्ये वाढले कानाचे आजार

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  लॉकडाउनच्या काळामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. आॅनलाइन क्लास, गाणे ऐकणे, गेम खेळणे आदी कारणासाठी तरुणाईच्या कानात नेहमीच हेड फोन लावलेला दिसतो आहे. मात्र,  मोबाईलच्या या अतिवापरामुळे विद्यार्थी व तरुणांमध्ये दुष्परिणाम आता समोर येत आहेत.  

कोरोनामुळे आज प्रत्येकाची जीवन शैली बदलली आहे. जगण्याचा क्रमही बदलला, त्यातच वर्क फ्राॅम होममुळे आॅनलाईन काम, विद्यार्थ्यांना सुद्धा आॅनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. आॅनलाईन क्लास, गाणे ऐकणे, गेम खेळणे आदी कारणासाठी तरुणाईच्या कानात नेहीच हेड फोन लावलेला दिसतो. मोबाईलच्या या अतिवापरामुळे विद्यार्थी व तरुणांमध्ये दुष्परिणाम दिसू लागले आहे.

हेही वाचा - उपचारानंतर नव्वद टक्के रुग्ण बरे, शनिवारी १९६ रुग्ण कोरोनामुक्त; चार बाधितांचा मृत्यू

कोरोनामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रामध्ये आॅनलाईन प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. स्मार्ट फोन, लॅपटॉप संगणकाबरोबरच हेड फोनचा वापर वाढला आहे. अनेकांच्या कानात तासनतास हेडफोन असतात. बाहेरील वातावरणात मोबाईलवर बोलणे, गाणी ऐकू येत नाही. म्हणून आवाज वाढविल्याने कानाच्या आतील असलेल्या नाजूक पडद्यावर परिणाम झाल्यामुळे कानाचे आजार वाढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकला जाताना अनेकजण कानात हेडफोन लावून वाकींगला जातात. रस्त्याने वाहनाच्या आवाजाने कमी ऐकू येते. म्हणून आवाज वाढविल्या जातो. त्याचा थेट परिणाम कानाच्या पडद्यावर होत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. 

हे देखील वाचाच - नांदेड : महापालिकेचे सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल बनले शोभेची वस्तु

कानाच्या पडद्यावर थेट परिणाम
अलिकडे मोबाईलमुळे कानाचे आजार वाढले आहेत, हे सत्य आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. त्याबरोबरच घशालाही त्रास होतो. सध्या वर्क फ्रॉम होम व विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या माध्यमातून शिकविल्या जात असल्यामुळे लहान मुलांच्या मोबाईल वापरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी डोळ्यांसोबत कानाच्याही तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
 
कानाचे दोष कसे टाळाल

  • कानात बसणाऱ्या हेडफोन ऐवजी कानाबाहेरील हेडफोनचा वापर करा. 
  • तासनतास हेडफोन व ब्ल्यूट्यूथचा वापर करू नका. 
  • दर २५ ते ३० मिनिटांनी हेडफोन काढून कानाला काहीवेळ विश्रांती द्या.

येथे क्लिक कराच - Video - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

मेंदूवरही होतो परिणाम
आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. शक्यतोवर हेडफोन टाळला पाहिजे. कारण आपले कान साधारण ६५ ते ७० डेसीबल पर्यंतचा आवाज सहन करू शकतात. त्यापेक्षा अधिक पातळी ठेवून हेडफोन, ब्ल्यूटुथ वापरले जात असल्याने त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे हेडफोनचा अधिक काळ वापर टाळला पाहिजे. ब्ल्युटुथ असो की हेडफोन त्यामध्ये चुंबकीय लहरीचा समावेश असतो. यातील चुंबकीय तरंग, लहरी या मेंदूला हाणीकारक ठरू शकतात.
- डॉ. मंजुषा एस. देशपांडे (कान, नाक, घसा तज्ज्ञ)