esakal | उपचारानंतर नव्वद टक्के रुग्ण बरे, शनिवारी १९६ रुग्ण कोरोनामुक्त; चार बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.१७) एक हजार ५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले

उपचारानंतर नव्वद टक्के रुग्ण बरे, शनिवारी १९६ रुग्ण कोरोनामुक्त; चार बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढली होती. त्याच पद्धतीने कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी (ता.१७) प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या एक हजार ५४ अहवालात ९२४ निगेटिव्ह, ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दहा दिवसाच्या उपचारानंतर १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हाभरातील संशयीत रुग्णांचे शुक्रवारी (ता.१६) स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.१७) एक हजार ५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १७ हजार ९८७ इतकी झाली आहे. शुक्रवारच्या अहवालातील उपचार सुरू असलेल्या बाधित रुग्णांपैकी ४७ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यामधील उज्वल नगर नांदेड पुरुष (वय ६१), बेलानगर नांदेड पुरुष (वय ६६), अर्धापूर पुरुष (वय ६५) आणि कांडली हिमायतनगर महिला (वय ७५) या चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्याभरातील ४८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- पहिल्याच दिवशी रेमडेसिव्हीर इंजेक्शनासाठी फिरवाफिरवी ​

आतापर्यंत १५ हजार ७९७ रुग्ण कोरोनामुक्त 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- चार, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - ११, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १२०, बिलोली - तीन, हदगाव - चार, किनवट - चार, लोहा-चार, मुखेड - पाच, मुदखेड - पाच, देगलूर - एक, कंधार - चार, माहूर - पाच, अर्धापूर - दोन व खासगी रुग्णालय कोविड सेंटरमधील २४ असे १९६ कोरोनाबाधित दहा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १५ हजार ७९७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज तीन फेस्टिवल विशेष गाड्या धावणार ​

आतापर्यंत १७ हजार ९८७ रुग्ण बाधित 

शनिवारच्या स्वॅब अहवालात नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात- ५६, नांदेड ग्रामीण- सहा, अर्धापूर-दोन, बिलोली-एक, किनवट- सहा, कंधार- तीन, हदगाव- एक, माहूर- एक, नायगाव- एक, उमरी- पाच, देगलूर- एक, लोहा- एक, मुखेड- एक, मुदखेड- एक, धर्माबाद- दोन, यवतमाळ- एक, हिंगोली- एक असे ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १७ हजार ९८७ रुग्ण बाधित झाले, त्यापैकी १५ हजार ७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९० टक्‍यापेक्षा अधिक असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. 

नांदेड कोरोना मीटर ः 

शनिवारी पॉझिटिव्ह- ९० 
शनिवारी कोरोनामुक्त- १९६ 
शनिवारी मृत्यू- ४ 
एकूण कोरोना पॉझिटिव्ह- १७ हजार ९८७ 
एकूण कोरोनामुक्त- १५ हजार ७९७ 
एकूण मृत्यू- ४८० 
उपचार सुरू- एक हजार ५९७ 
गंभीर रुग्ण- ५० 
अहवाल येणे बाकी- ३५८