कापूस विक्रीसाठी २५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी    

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

नांदेड : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने विक्रीसाठी पुढे दिलेल्या ऑनलाईन लिंकवर सोमवारपर्यंत (ता. २५) शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघु संदेश पाठविण्यात येणार असून लघु संदेशामध्ये नमूद तारखेला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदीसाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शनिवारपर्यंत (ता.२५) ज्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. 

हेही वाचा....पीक कर्जासाठी 38 हजार ऑनलाइन अर्ज

ऑनलाईन बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान  
जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे कापूस शेतकऱ्यांना नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ही ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत असून ही लिंक तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

हेही वाचलेच पाहिजे.....लॉकडाऊनमुळे थकले तुरीचे चुकारे

तालुका ऑनलाईन लिंक
माहूर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzcWe3QebRrQsdsIlMVulNoE0D1lWN...
किनवट
https://forms.gle/2cK6Jq4KJcx3iSeN7
कंधार व लोहा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6X...

नायगाव व बिलोली
https://forms.gle/75pkzNgvSPeSVJ1w5
मुखेड
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTAtU_P3UtS3mv8Saa8VUu_XP_8WQr...
धर्माबाद
https://forms.gle/p6TsjVDRXjKTBSpR6
उमरी
https://forms.gle/6z5EJs942vzyj5NdA
हदगाव व हिमायतनगर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKzK4j5wB9C0NLZ491EAV2Bu__dGFi...
भोकर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFWNzoqbxLAHF7xSWIrf4EiCNKrx1H...
देगलूर
https://drive.google.com/open?id=19v5BUv4Mu6LKZaZbTmQLMa7KUd6xnFZgZyinbr...

नांदेड, अर्धापूर व मुदखेड
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQJTeiXq238EALuS6dKeeFymetSi_U...
माहूर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzcWe3QebRrQsdsIlMVulNoE0D1lWN... किनवट https://forms.gle/2cK6Jq4KJcx3iSeN7

कंधार व लोहा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6X... नायगाव व बिलोली https://forms.gle/75pkzNgvSPeSVJ1w5 मुखेड  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTAtU_P3UtS3mv8Saa8VUu_XP_8WQr... धर्माबाद https://forms.gle/p6TsjVDRXjKTBSpR6  उमरी https://forms.gle/6z5EJs942vzyj5NdA 

हदगाव व हिमायतनगर

https://docs.google.com/form /d/e/1FAIpQLSeKzK4j5wB9C0NLZ491EAV2Bu__dGFiYWI6aQDBGY1v3YomIA/viewform?vc=0&c=0&w=1 भोकर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFWNzoqbxLAHF7xSWIrf4EiCNKrx1H... देगलूर https://drive.google.com/open?id=19v5BUv4Mu6LKZaZbTmQLMa7KUd6xnFZgZyinbr... नांदेड, अर्धापूर व मुदखेड https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQJTeiXq238EALuS6dKeeFymetSi_U...

पणन महासंघ व बाजार समिती सचिव यांची समिती 
महसूल प्रशासनाने दिलेल्या या ऑनलाईन लिंकवर शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. २५) प्राथमिक नोंदणी करावी. एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तालुका स्तरावर उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online registration for sale of cotton up to 25 may