मॉं जिजाऊंचे संस्कारच बलात्काराच्या घटना थांबवू शकतात- डॉ गंगाधर घुटे

प्रल्हाद कांबळे
Monday, 5 October 2020

जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात त्या घटनेचा निषेध होतो काही लोक हा निषेध सुद्धा जात,पात,धर्म,राज्य सरकार, पक्ष ई पाहून करतात.

नांदेड : खैरलांजी, कोपर्डी, दिल्लीतील निर्भया असो किंवा हाथरसमधील पिडीत असो माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटना अंतःकरण व्यतिथ करतात. तसेच अशा गुन्हेगाराला फाशी मिळत नाही हे त्याहूनही क्लेशदायक आहे. जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात त्या घटनेचा निषेध होतो, काही लोक हा निषेध सुद्धा जात, पात, धर्म, राज्य सरकार, पक्ष ईत्यादी पाहून करतात.

अशा घटना आता सातत्याने घडत आहेत आणि या सर्वांच्या मुळाशी कारणीभूत असलेल्या प्रामुख्याने तीन गोष्टी आहेत आपल्या कुटुंब व्यवस्थेतील स्त्रीचे दुय्यम स्थान, शिक्षण व्यवस्थेतील मूल्य शिक्षण या विषयाकडे झालेलं दुर्लक्ष आणि सर्वात महत्वाचे कारण आपल्या देशातील कमकुवत न्यायव्यवस्था जोपर्यंत या तिनही पातळीवर आमूलाग्र बदल होत नाहीत तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार कुणी निषेध करो अथवा न करो.

हेही वाचासंकल्प सर्वच करतात, पण पुढे काय होते? ते वाचाच -

संस्कार प्रत्येक कुटुंबातील मुलांवर झाल्यास भविष्यात अशा घटनाच घडणार नाहीत.

कौटुंबिक व्यस्थेतच स्त्रीला मनाचे स्थान मिळाले आणि मुलांच्या मनात बाल्यअसवस्थेतच स्त्री चा आदर करण्याचे संस्कर रुजविले तर भविष्यात आशा घटनाच घडणार नाहीत. राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊनी जे संस्कार छत्रपती शिवराय यांना दिले त्यामुळे शिवराय मातृशक्ती चा सन्मान करणारे आदर्श राज्यकर्ते होऊ शकले. असेच संस्कार प्रत्येक कुटुंबातील मुलांवर झाल्यास भविष्यात अशा घटनाच घडणार नाहीत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुध्दा मूल्य शिक्षणावर भर असायला पाहिजे. केवळ मूल्य शिक्षणाचा तास असून चालणार नाही तर त्या विषयाचा पेपर घेतला जावा.

फाशीची तरतूद झाली तरच भविष्यात अशा प्रकाराला आळा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या प्रचलित न्यायव्यावस्थेत आमूलाग्र बदल करून बलात्कारच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या खटल्याचा निकाल स्थानिक न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत एका वर्षाच्या आत लागला पाहिजे तरच आपल्या देशात अशाप्रकारची गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. तीस चाळीस वर्षे चालणारे खटले कोणता न्याय निवाडा करत असतील ? त्यामुळेच जलद न्यायव्यवस्था व बलात्काराच्या गुन्हेगाराला एका वर्षाच्या आत फाशीची तरतूद झाली तरच भविष्यात अशा प्रकाराला आळा बसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Mother Jijau's rites can stop the incidents of rape Dr. Gangadhar Ghute nanded news