कोरोनावर मात करित जिल्हधिकारी उतरले टेनिस कोर्टवर,खेळाडूंना दिला तंदुरुस्तीचा संदेश..

प्रा. ईम्तीयाज खान
Friday, 2 October 2020

डाॅ. ईटनकर नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले व ..मार्च महिन्यात लाॅकडाउन घोषित  झाला. सुरवातीला ग्रीन झोन मध्ये झडकनारा नांदेड  जिल्हा कोरना बाधीतहोने सुरु झाले.

नांदेड : जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कर्तव्य पार पाडनारे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन ईटनकर कोरनासारख्या घातक रोगावर मात करुन पुढील कार्य उत्साहात व जोमाने करण्यासाठी तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच नांदेड क्लब येथे दररोज सकाळी टेनिस कोर्टवर सराव करीत आहेत. कोरनावर मात करण्यासाठी सर्वांनी तंदुरुस्ती व शरिरसंवर्धन करावे असा संदेश देत आहेत. 

डाॅ. ईटनकर नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले व मार्च महिन्यात लाॅकडाउन घोषित झाला. सुरवातीला ग्रीन झोनमध्ये नांदेड जिल्हा कोरोना बाधीत होने सुरु झाले. सुरूवातीस शहरीं भाग व कालांतराने ग्रामीन भास असा पुर्ण जिल्हा कोरोनाच्या  विळख्यात सापडला. डाॅ. ईटनकर, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत अहोरात्र लोकांच्या सुरक्षासाठी झटू लागले. लाॅकडाउनमध्ये लोकांना घरीच थांबावे यासाठीच आव्हान करू लागले, विनाकारण बाहेर फिरनाऱ्यावर रस्त्यावर उतरुन कडक शिस्त लावली. कारवाईही केली. दुसरीकडे बाधितांची संख्या  वाढु लागली. वैद्यकीय सुविधा. खाटांची अपुरी संख्या, पर राज्यातील विद्यार्थी, मजुर , यात्री या सर्वांची सुरक्षेची जबाबदारी या सर्व मोर्च्यावर डाॅ. ईटनकर यांची टिम हिंमतीने लढा देत होती.

हेही वाचा -  केंद्राचे निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण देशालाही घातक- शिवाजी शिंदे -

निर्धारित कालावधीत उपचार पुर्ण करुन कोरोनावर मात

इतर प्रशासकीय जबाबदारी पण तितक्याच क्षमतेने पार पाडत होते. अहोरात्रीच्या जंनसंपर्काने जिल्हाधिकारी अनाहुतपणे कोरोना बाधिताचया संपर्कात आले व मागील महिन्यात कोरोना बाधीत झाले. अशावेळी हिम्मत न सोडता व हायफाय उपचारासाठी खाजगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू  असतांनाही कर्तव्य बजावले. याच काळात अतिवृष्टी व पुरासारख्या संकटांनाही तोंड दिले. निर्धारित कालावधीत उपचार पुर्ण करुन कोरोनावर मात करुन योद्धा होउन जिल्हाधिकारी पुन्हा जोमाने प्रशासकीय मैदानात उतरले. येणाऱ्या काळात समोर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे हे जाणून जिल्हाधिकारी आपल्या आवडत्या टेनिस कोर्टवर सरावासाठी उतलवे आहेत. तंदुरुस्ती बरोबरच प्रशासकीय कार्याचा मानसिक व शारीरिक थकवा दूर करण्यासाठी त्यानी टेनिस सरावाची निवड केली. नांदेड क्लब येथे नियमित सराव करणारे डाॅ. माधवराव किनहाळकर, अलि पंजवाणी, शांतुनू डोईफोडे, हरजिंदरसिंघ चिरागीया, मधुसुदन गुप्ता आदी बरोबर त्यांचा सराव सुरू आहे.

येथे क्लिक करा - दुर्देवी घटना : सहस्त्रकुंड धबधब्यात घेतलेल्या उड्यांच्या शिंतोड्यास जबाबदार कोण?

तंदुरुस्त राहणे व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविणे

कोरोना व आयुष्यात येणाऱ्या या ईतर संकटावर मात करण्यासाठी तंदुरुस्त राहणे व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी नियमितपणे व्यायाम करणे, जाॅगींग, चालने , धावने, सायकलिंग करने सारख्या कसरती सर्वांनी कराव्या असा संदेश त्यानी लोकांना व खेळाडूंना दिला आहे. 

संपादन -प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming Corona, the Collector landed on the tennis court, giving a message of fitness to the players nanded news