esakal | केंद्राचे निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण देशालाही घातक- शिवाजी शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आवश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीत सुधारणा करणे आवश्यक आहे. शेतीमालाच्या किमती वाढल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्यात त्या पिकाचा समावेश करणारी तरतूद शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, साठवणूक करणाऱ्यांसाठी व निर्यातदारांसाठी घातक आहे.

केंद्राचे निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण देशालाही घातक- शिवाजी शिंदे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : केंद्र शासनाने शेती व्यापार सुधारणा विधेयके मंजूर करुन शेतकऱ्यांना काही प्रमाणात व्यापार स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबाही दिला आहे, परंतू त्यातील आवश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीत सुधारणा करणे आवश्यक आहे. शेतीमालाच्या किमती वाढल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्यात त्या पिकाचा समावेश करणारी तरतूद शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, साठवणूक करणाऱ्यांसाठी व निर्यातदारांसाठी घातक आहे.

निर्यातीबाबत धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्र व्यापारातील संबंध बिघडत आहेत व शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापारावर याचा अनिष्ट परिणाम होत आहे, अशी तरतूद देशालाही घातक आहे. सध्या लादलेल्या कांदा निर्यातबंदीचे उदाहरण ताजे आहे. तसेच संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सरसकट मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना विमा मंजूर करावा, कोरोना काळातील शेती पंपाचे पूर्ण वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना बॅंका कर्ज देत नाहीत, पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना सरसकट रब्बी हंगामाकरिता एकरी 10 हजार रूपये अनुदान त्वरीत देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, ऍड. धोंडिबा पवार, जि. प. सदस्या पूनमताई पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

 हेही वाचा  Video - नांदेडला काँग्रेसचा प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च -

शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबवून शेतकऱ्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. शेतकरी संघटनेच्या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यसाठी दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या दिवशी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केले. प्रारंभी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गांधी पुतळा वजिराबाद येथे म.गांधी, लालबहादूर शास्त्री आणि शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदरील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला व शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी मास्क लाऊन व शारीरिक अंतराचे पालन करुन आंदोलनात सहभाग नोंदवला.

यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी किशनराव पा. येळेगावकर, व्यंकटराव पा. वडजे, रामराव कदम कोंढेकर, आर.पी. कदम, जमुनाबाई ढगे, माधवराव पा. सिंधीकर, पंडितराव हंबर्डे, विठ्ठल रेड्डी, बाबू पाटील, मारोती शिंदे, युवराज पा. शिंदे, गंगाधर पाटील, गणेश कदम, दत्तराव चौतमल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.