
मातृतीर्थ येथील पाण्यातील ऑक्सिजन हे 11.00 ppm आढळून आले. एवढ्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन हे केवळ हिमालयन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.
नांदेड : गोदावरी नदी संसद" परिवारामार्फत नांदेड जिल्ह्यातील जलप्रदूषण तपासणी केमिकल किटद्वारे करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत माहूर येथील मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील पाण्याचे आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. मातृतीर्थ येथील पाण्यातील ऑक्सिजन हे 11.00 ppm आढळून आले. एवढ्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन हे केवळ हिमालयन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.
पुरातन ग्रंथामध्ये मातृतीर्थ कुंडाची निर्मिती श्री रेणुकादेवी पुत्र श्री परशुराम भगवान यांनी केली आहे. तसेच हे कुंड म्हणजे गंगेचे तीर्थ समजल्या जाते. या प्रयोगामुळे मातृतीर्थ येथील जल हे अत्तीउच्च दर्जाचे आहे हे सिद्ध होते. तसेच भानुतीर्थ कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 10.5 ppm आढळून आले आहे. काशीकुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 8.5 ppm आढळून आले आहे. तसेच ऋण मोचन कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 10.00 ppm आढळून आले आहे.
हेही वाचा - नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय; अशोक चव्हाणांचे प्रयत्न यशस्वी
2019 मध्ये श्री रेणुका देवी संस्थान, सूर्योदय फौंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, माहूर महाश्रमदान ग्रुप, जलस्वराज्य परिवार यांच्या सहकार्याने या कुंडातील शेकडो वर्षे साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला होता. हा गाळ काढण्यात आल्यामुळे या सर्व कुंडास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.
मातृतीर्थ परिसर विलोभनीय
2020 मध्ये श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मातृतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कन्हव यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. मातृतीर्थ परिसर अत्यंत विलोभनीय दिसत आहे.
हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी फैसला
डोळ्याचे पारणे फेडणारे कुंड
भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे मातृतीर्थक्षेत्रचे दर्शन भक्तगणाना सूर्योदय व सुर्यास्तास होत आहे. निलेश केदार गुरुजी व माहूर महाश्रमदान ग्रुप यांचे सहकार्य या कार्यास लाभत आहे.
वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येणार
भविष्यात पाणीप्रदूषण न होण्यासाठी गोदावरी नदी संसद मार्फत वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्वसमावेशक "गोदावरी नदी संसद" फेसबुक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे असून शेकडो नांदेडकर या मोहिमेशी जुडले आहेत. सर्व नदी व कुंड प्रेमींनी या ग्रुपशी जुडावे असे आवान संयोजक दिपक मोरताळे यांनी केले आहे.