पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम ‘या’ गुरूरत्न पुरस्काराने सन्मानीत होणार

file photo
file photo

नांदेड : दरवर्षी देण्यात येणारे डॉ. शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम यांच्यासह नऊ जणांना जाहीर झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, ह्युमन राईटस फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी माजी गृहमंत्री, जल संस्कृतीचे जनक, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त ता. १४ जुलै रोजी राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत व्यक्तिमत्वांचा डॉ. शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते. सदरील पुरस्काराचे हे अखंडीत बारावे वर्ष आहे.

हे आहेत गुरूरत्न पुरस्काराचे मानकरी 

यंदा देशद्रोहासह बलात्कारी- अत्याचारी नराधमांना फाशीची शिक्षा मिळवून देणारे विधिज्ञ पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम, सिंघम या चित्रपटासह अनेक सिनेमातून आपली प्रतिभा निर्माण करणारी अभिनेत्री निलिमा कुलकर्णी, चला हवा येऊ द्या या मालिकेसह विविध सिनेमात काम करणारे हास्यसम्राट भारत गणेशपुरे, गो- सेवेतून सामाजिक संदेश देणारे पद्मश्री शब्बीर सय्यद, संगीत क्षेत्रात नावलौकीक मिळवणारे नामवंत संगीतकार सलील कुलकर्णी, आनंदी नारायण कृपा न्यास कर्जतचे मठाधिपती समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी, राजकीय क्षेत्रात कमी वेळात ठसा उमटवणारे लातूरचे युवा नेते संतोष देशमुख, आदर्श ग्राम व्यवस्था निर्माण करणारे सरपंच भास्कर पेरे पाटील आणि देश- विदेशात आपल्या उद्योगातून भरारी घेणारे नाशिकचे जयंत सानप यांना जाहीर करण्यात आला आहे.

गुरूरत्न प्राप्त मान्यवरांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान 

सदरील सोहळा दरवर्षी ता. १४ जुलै रोजी नांदेड येथे संपन्न होत असतो. यावर्षी कोरोना या जागतीक महामारीमुळे प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर होणार आहे. किंवा परिस्थिती पाहून सदरील गुरूरत्न प्राप्त मान्यवरांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक रामेश्वर धुमाळ व संपादक रूपेश पाडमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

हे घेत आहेत परिश्रम

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, अरविंद जाधव, सखाराम कुलकर्णी, दिलीप माहोरे, संगीताताई बारडकर, जयलक्ष्मी गादेवार, उषा हडोळतीकर, रूपाली रघुजीवार व रुपेश पाडमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com