
Nanded Election
sakal
नांदेड : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदासाठी अखेर आरक्षण सोडतीचा मुहूर्त मिळाला आहे. जिल्ह्यातील विविध १६ पंचायत समित्यांतील सभापतिपदांसाठी आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. दहा) नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे काढली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.