परभणीचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी केले फौजदार चंद्रकांत पवार यांना सन्मानीत

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी प्रजासत्ताक दिनी सन्मान पत्र देऊन गौरविले आहे.

नांदेड : मागील तीन महीन्यात परभणी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात सतत २०० कार्यवाही करणा-या परभणी पोलिस दलातील कर्तबगार पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी प्रजासत्ताक दिनी सन्मान पत्र देऊन गौरविले आहे.

नांदेड येथुन दिड ते दोन वर्षांपूर्वी परभणी पोलिस दलात बदली होऊन रुजु झालेले चंद्रकांत पवार यांनी पुर्णा येथे आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. येथे त्यांनी निर्घुण खून, विनयभंग, बलात्कारसह बहुचर्चित आॅनरकिलींग प्रकरणाचा छडा लावत आरोपींना गजाआड केले होते. शहरासह परिसरात दारु, मटका, जुगार, गुटखा या अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करुन सोडले होते. त्यांची मागील तीन ते चार महीन्यापुर्वी नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली होती. जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधाचा बिमोड करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या पथकाचे श्री. पवार यांना प्रमुख केले.

पवार यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जिल्ह्यातील विशेष पथकाची जबाबदारी सोपावली. या जबाबदारी त त्यांनी व त्यांच्या संपूर्ण सहकारी पोलिस अधीक्षक मिना यांच्या विश्वासास पात्र ठरत त्यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य, वाळु चोरी, अवैध गुटखा विक्री,चंदन तस्करी, अवैध शस्त्रधा-यांवर कार्यवाही शेकडो कार्यवाही केल्या त्यासह नुकतीच दुचाकी तस्कारांवर मोठी कारवाई करत त्यांच्याकडून ३२ दुचाकी जप्त केल्या. जिल्हाभरात जवळपास २०० कार्यवाह्या केल्या. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रकांत पवार यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलिस खात्यासह सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Superintendent of Police Jayant Mina honored Faujdar Chandrakant Pawar nanded news