
सामाजिक अंतर ठेऊन शाळा सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने एका परिपत्रकानूसार शाळा चालू होणार असल्याचे कळविले.
नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भआव कमी होत चालल्याने शासनाने टप्प्याटप्याने शाळा सुरु केल्या आहेत. राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा ता. २७ जानेवारीपासून पूर्ववत सुरु होत आहेत. सामाजिक अंतर ठेऊन शाळा सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने एका परिपत्रकानूसार शाळा चालू होणार असल्याचे कळविले.
शासन नियमानूसार विद्यार्थी वाहतूकीसाठी आसन क्षमतेच्या दिडपट विद्यार्थी वाहतूक करता येते. पण कोरोना महामारीच्या काळात शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थी वाहतुक करावी लागणार आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे करावे लागणार आहे.
वरील नियमानूसार विद्यार्थी वाहतूकीचे दर हे नाइलाजास्तव दुप्पट करावे लागणार आहेत. मागील १० महिन्यापासून विद्यार्थी वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी वाहतुकदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
हेही वाचा - नांदेड - वार्धक्याकडे झुकलेल्या कलामंदीराला आजही कलावंताची प्रतिक्षा
पालकांनी वरील सर्व बाबींचा सहानूभतीपूर्वक विचार करुन सध्याची परिस्थिती असेपर्यंत व परिस्थिती सामान्य होईपर्यंत विद्यार्थी वाहतूकीचे दर दुप्पट देऊन सहकार्य करावे. कोरोना महामारीचा काळ संपताच व शासनाचा आदेश आला की नियमाप्रमाणे दर पुन्हा पूर्ववत करण्यात येतील. असे जिल्हा स्कूल बसचे अध्यक्ष निखील लातूरकर यांनी कळविले आहे. तसेच सर्व फायनान्स कंपन्यांना विनंती करण्यात आली असून कुठल्याही स्कूलबस, व्हॅन, मॅजिकच्या चालक- मालक यांची अडवणूक करु नये. अन्यथा सर्व फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशाराही श्री. लातूरकर यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्याच्या इतर महत्वाच्या घडामोडीसाठी येथे क्लिक करा