
नांदेड : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही निवाऱ्यांची छप्परे अक्षरशः कोसळलेली आहेत. पाऊसामध्ये छत गळत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते.
छत फुटल्यामुळे निवाऱ्यात पाणी साचते, गळका पत्रा आणि दुर्गंधीयुक्त परिसरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नांदेड बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु, या प्रवाशांसाठी पुरेसे व सुरक्षित निवारे उपलब्ध नसल्याने नागरिकांना उघड्यावर थांबावे लागते.