शेतकरी-कष्टकरी संघर्ष समिती झाली आक्रमक

deglur.jpg
deglur.jpg


देगलूर, (जि. नांदेड)ः अतिवृष्टीने झालेली नुकसानी पाहता शासनाने दिलेली हेक्टरी १० हजार रूपयाची मदत खूपच तुटपुंजी आहे. नदी-नाल्यांमुळे खरडून गेलेल्या जमिनींचा विशेष पंचनामा करून वाढीव मदत जाहीर करावी, देगलूर, मुखेड, बिलोलीसह संपूर्ण नांदेड जिल्हाचा पीकविमा तात्काळ मंजूर करून पीकविमा अदा करावा या व इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. 

मागण्यांबाबत धरणे आंदोलनात विस्तृत प्रबोधन 
पीकविमा व वाढीव नुकसानभरपाई सोबतच कर्जमाफी व पीककर्जाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा, पीकविमा करारातील जाचक अटी रद्द करून ९० टक्के जोखीमस्तराने पीकविमा अदा करावी, नुकसानग्रस्त शेतमजूरांनाही दरडोई आर्थिक मदत जाहीर करा, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्णवेळ व दिवसा वीज उपलब्ध करून द्या या मागण्यांबाबत धरणे आंदोलनात विस्तृत प्रबोधन करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या तत्काळ पूर्ण नाही केल्या तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. 

उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन 
या वेळी पीकविमा प्रश्नाचे गाढे अभ्यासक राजन क्षीरसागर, परभणीचे माणिकराव कदम, शिवाजीराव कदम व संघर्ष समिती, नांदेडचे निमंत्रक कैलास येसगे कावळगावकर यांनी आंदोलना मागची भूमिका विस्तृतपणे विषद करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्र गवाले, शेतकरी पुत्र आंदोलनाचे बालाजी पाटील, किसान सभेचे राजेश्वर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष अल्लापूरकर, डॉ. उत्तम इंगोले, ज्येष्ठ नागरिक संघाचे व्यंकटराव भोसले, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशीकांत कांबळे, शेतकरी विठ्ठलराव पाटील, जयदीप वरखिंडे, दशरथ गाडे यांनी भाषणे करून पाठींबा जाहीर केला.


या आंदोलनात प्रा. गंगाधर हिंगोले, एच. एस. खंडागळे, राजू पाटील, सुर्यकांत देशमुख, दिपक मोघे, प्रशांत देशमुख, विजय पाटील, आनंदराव गायकवाड, विष्णूकांत पाटील, प्रविण इनामदार, संजय कांबळे, रामशेट्टी बाळूरे, ॲड. अविनाश सुर्यवंशी, संतोष आगलावे, गजानन पाटीलसह देगलूर मुखेड परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी घाळप्पा अंबेसंगे, गंगाधर आऊलवार, मन्मथ काळे, संदिप राजूरे, विकास नरबागे, सुभाष कदम, माधव पाटील, दिपक रेड्डी, संग्राम आंगडे, दिलीप पाटील, बसवंत पटणे, विनायक पाटील, मारोती पाशमवार, तुकाराम मारकवाड यांनी परिश्रम घेतले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com