कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी

प्रल्हाद कांबळे
Sunday, 25 October 2020

नांदेड जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा 25 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यासाठी  सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमुद (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहुन परवानगी देण्यात आली आहे.

नांदेड : कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा रविवार (lता. 25)  ऑक्टोंबरपासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा 25 ऑक्टोंबरपासून सुरु करण्यासाठी मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहुन परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचाकोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील २६७ ग्रामपंचायतीवर प्रशासक -

संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट 1 मध्ये नमूद (एसओपी) मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार  त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to start gymnasium outside the content zone nanded news

Tags
टॉपिकस
Topic Tags: