प्लाझमा थेरपीचा प्रयोग लवकरच होणार...कुठे ते वाचा

File Photo
File Photo

नांदेड : विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी केंद्र शासनाकडे प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती गुरुवारी (ता.चार जून) नांदेडच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या लाईव्ह फेसबुक पेजद्वारे ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात लवकरच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. 

अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के म्हणाले की, प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी यंत्रसामग्री हकीम या कंपनीकडून मिळाल्यास शहरामध्ये प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धत राबवता येईल. शंभर वर्षे जुनी असलेली प्लाझ्मा थेरपीचा वापर यापूर्वी अमेरीका आणि चिन या देशात झाला आहे. त्यानंतर हा प्रयोग दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात करण्यात आला.  परंतु या उपचार पद्धतीद्वारे रुग्ण बरा होईलच याची जागतीक आरोग्य संघनेनी कुठेही खात्री दिलेली नाही. तरी देखील ही उपचार पद्धती काही प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे व कोरोना विषाणू शरिरात प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात यशस्वी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

नांदेड, परभणी व बीड जिल्ह्यातील रक्तजलांचे स्वतंत्रपणे सर्वेक्षण 

यापूर्वी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)च्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या मुख्य कार्यालयातील आरोग्य पथकाकडून नांदेड, परभणी व बीड जिल्ह्यातील रक्तजलांचे स्वतंत्रपणे सर्वेक्षण केले. दरम्यान  विविध ठिकाणच्या भागात जाऊन नागरिकांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले. या रक्तजल साठ्यांचा चेन्नई येथील प्रयोगशाळेत रक्तातील एंटीबॉडी वेगळे करण्यावर प्रयोग केला जाणार असल्याचे पथकातील श्रीमती चौधरी यांनी माहिती दिली होती.


या उपचार पद्धतीच्या माध्यमातून मानवाच्या रक्तातील विशेषतः कोरोना आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तींचे रक्त घेऊन प्लाझ्मा मार्फत विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णास दिले तर या रुग्णाच्या बॉडी कोरोना व्हायरसला शरीरातून नष्ट करण्यास मदत करतो व आजारी रुग्णाच्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. असा या थेअरपीचा उपयोग होतो, असे मानले जाते.  परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर या पद्धतीचा प्रयोग कितपत खरा ठरेल हे अद्यापतरी स्वष्ट नाही.  

प्रतिजैविके विषाणूला शरीरात वाढण्यास मज्जाव 

कोरोनासारख्या भयंकर आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन बाधित व्यक्तीच्या शरीरात सोडल्या जातात. त्यामुळेही प्रतिजैविके विषाणूला शरीरात वाढण्यास मज्जाव करतात. तसेच हे प्रतिजैविके रुग्णाच्या बाह्य आवरणावर देखील चांगल्या पद्धतीने कार्य करतात व बाधित व्यक्तीच्या पेशीमध्ये विषाणूला घुसण्यास रोखतात. यामुळे विषाणू नष्ट होऊन बाधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मोठ्या शहरात प्लाझ्मा प्रयोग
जागतिक आरोग्य संघटनेने अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांवरच प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी दिली आहे.  या उपचार पद्धतीचा पहिला प्रयोग चीन-अमेरिका या देशात झाला आहे. त्यानंतर दिल्ली आणि मुंबई अशा मोठ्या शहरात देखील हा प्रयोग करण्यात आलेला आहे.
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता (डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com