प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत ता. ३१ जुलैपर्यंत

file photo
file photo

नांदेड - जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० - २१ साठी खरीप ज्वारी, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. ३१ जुलै) दिली आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक होती. यावेळेस शेतकऱ्यांना ऐच्छिक केली आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के व कापसासाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आपत्ती आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता असा राहील 
या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे राहील. ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस पिकासाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम २५ हजार रुपये, विमा हप्ता दर २४ टक्के, विमा हप्ता रक्कम सहा हजार रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर दोन टक्के, विमा हप्ता रक्कम पाचशे रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता ११ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार ७५०, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर ११ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार ७५० रुपये.

सोयाबीन पिकासाठी विमा
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रुपये, विमा हप्ता दर ३० टक्के, विमा हप्ता रक्कम १३ हजार पाचशे रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर दोन टक्के, विमा हप्ता रक्कम नऊशे रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता १४ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम सहा हजार तीनशे, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर १४ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम सहा हजार तिनशे रुपये.

मूग पिकासाठी विमा 
मूग पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम २० हजार रुपये, विमा हप्ता दर २४ टक्के, विमा हप्ता रक्कम चार हजार आठशे रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर दोन टक्के, विमा हप्ता रक्कम चारशे रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता ११ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार दोनशे, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर ११ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार दोनशे रुपये.

उडीद पिकासाठी विमा
उडीद पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम २० हजार रुपये, विमा हप्ता दर २६ टक्के, विमा हप्ता रक्कम पाच हजार दोनशे रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर दोन टक्के, विमा हप्ता रक्कम चारशे रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता १२ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार चारशे, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर १२ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम दोन हजार चारशे रुपये.

तूर पिकासाठी विमा 
तूर पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, विमा हप्ता दर २७ टक्के, विमा हप्ता रक्कम नऊ हजार ४५० रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर दोन टक्के, विमा हप्ता रक्कम सातशे रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता १२.५ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम चार हजार ३७५, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर १२.५ टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम चार हजार ३७५ रुपये. 

कापूस पिकासाठी विमा
कापूस पिकासाठी विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रुपये, विमा हप्ता दर १९ टक्के, विमा हप्ता रक्कम आठ हजार ५५० रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर पाच टक्के, विमा हप्ता रक्कम दोन हजार २५० रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता सात टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम तीन हजार १५०, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर सात टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम तीन हजार १५० एवढी रक्कम आहे, असेही नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com