dhrmabad valu.jpg
dhrmabad valu.jpg

प्रशासनाचा दणका अन् वाळू वाहतुकीला लगाम


धर्माबाद, (जि. नांदेड) : धर्माबाद तालुक्यातील संगम नदीपात्रातून व गोदावरी नदी पात्रातून बेसुमार चोरटी वाळू वाहतूक केली जात होती. या संदर्भात ‘सकाळ’ने मालिका प्रकाशीत केली. या मालिकेची उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दखल घेत अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिल्या. त्यानुसार तहसीलदार यांनी वाळूची अवैध वाहतूक पकडण्यासाठी ग्रीन फिल्ड शाळेजवळ पथक नियुक्ती केले आहे. या पथकाची वाळू माफियांवर करडी नजर असल्याने वाळू वाहतुकीला लगाम लागला असून चोरटी वाळू वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

पर्यावरणास मोठा धोका

धर्माबाद तालुक्यातील संगम नदीपात्रातून व गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरीत्या होत असलेल्या या वाळू उपशामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला होता. धर्माबाद तालुक्यातील संगम, मनूर, नेरली, बामणी, विळेगाव (थडी), मोकली, सिरसखोड या रस्त्यावरून सिरसखोड कॉर्नर, ग्रीन फिल्ड शाळेजवळून बाळापूर मार्गे धर्माबाद शहरात व ग्रीन फिल्ड शाळेजवळून महाराष्ट्र बसस्थानक, शंकरगंज, रत्नाळी, रेल्वेगेट नंबर दोन, फुलेनगरसह शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक केली जात होती. या बाबत ‘सकाळ’मध्ये अखंडित मालिका प्रकाशीत करण्यात आली.

वाळू माफियांचे धाबे दणाणले

या मालिकेची दखल घेत उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संगम नदीपात्रातील चोर रस्ते जेसीबीने खड्डे खोदून बंद करण्यात आले होते. परंतु, वाळू माफियांनी नवीन रस्ता तयार करून रात्रीच्या वेळी पुन्हा चोरटी वाळू वाहतूक जोमाने सुरू करून वाळू माफियांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना पुन्हा एकदा आव्हानच दिले होते. कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी हे आव्हान स्वीकारून वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदार शिंदे यांनी पथक नियुक्ती करून आपण स्वतः संगम नदीपात्र व गोदावरी नदी पात्राच्या ठिकाणी रात्रीला एक दोन वेळेस भेटी देत आहेत. या पथकात तलाठी सचिन उपरे, बी. जी. कदम, ए. एस. देवापुरे यांचा समावेश असून वाळू माफियांची झोपच उडवली आहेत. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com