नांदेडमध्ये दुचाकी चोरट्यांसमोर पोलिस प्रशासन हतबल

दररोज दोन ते पाच दुचाकींची होतेय चोरी ; तपास मात्र शून्य
Crime
Crime sakal media

नांदेड : शहर व जिल्ह्यात जबरी चोरीसह दुचाकी चोरीच्या (crime news) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कार्यालयात अथवा बाजारपेठेमध्ये (market) जाताना दुचाकीधारकांमध्ये दुचाकी चोरट्यांची दहशत पसरली आहे. दररोज दोन ते पाच दुचाकींची चोरी होत असून, दुचाकी चोरट्यांसमोर पोलिस प्रशासन(nanded police) हतबल झालेले आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होतात. परंतु, तपास शून्य होत असल्याने पुढे त्याचे काय होते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.संभाजी आनंदराव लोंढे (रा. लोंढेसांगवी (ता.लोहा) यांची २० हजार रुपये किंतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर (एमएच-२६, एक्यु-८०२५) घरासमोरून चोरीला गेली असून, सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

Crime
Aurangabad Update : उच्चांक मोडणाऱ्या मोसंबीची मातीमोल भावाने विक्री

अजमत अली जिलानी इनामदार (रा. सावरगांव पिर, ता.मुखेड) यांची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, एएन-७०८२) घरासमोरून चोरीला गेली असून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच उमाकांत शंकरराव माने (रा. देगाव बु.ता. देगलूर) यांची १५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच-२६, एई-९४६३) रिलायंस माॅल छत्रपती चौक नांदेड येथून चोरीला गेली असून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय ज्ञानेश्वर बालाजी जाधव (रा. देगाव, ता.अर्धापूर) यांचीही २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, एडब्ल्यु-९०२५) विष्णुनगर येथून चोरीला गेली असून, शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com