कंटेनरखाली बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला पोलिस कोठडी

file photo
file photo

नांदेड : दोन वर्षाच्या बाळाला चक्क कन्टेनरखाली फेकून खून करणाऱ्या निर्दयी मातेला येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एस. गवई यांनी २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना शहरापासून जवळच असलेल्या बोंढार (ता. नांदेड) येथे शुक्रवारी (ता. २२) सकाळी घडली होती.

बोंढार येथील विवाहीत बालाजी तिडके याच्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील एका विवाहितेचा अनैतिक संबंध होता. हे संबंध एवढे वाढले होते की, बोंढार येथून तो व्यक्ती डोंगरकडा येते जात असे. हा प्रकार गंभीर असल्याने त्याच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्याला व तिला अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार उजागर झाल्यानंतर बालाजी तिडके याने पिडीत महिलेच्या पतीला सांगितले की मुलाला व त्याच्या आईला माझ्याकडे आणून सोड. आणल्यानतंर त्याने तिला स्विकारण्यास नकार दिला.

हेही वाचाखळबळजनक : साधूसह शिष्याच्या हत्येने नांदेड हादरलं
   
दोन वर्षाच्या बालकाचा चेंदामेंदा

बोंढारला का आलीस म्हणून तिच्या विवाहित प्रियकराच्या नातेवाईकानी त्यालाही व तिलाही बोदम मारहाण केली. हे प्रकरण चव्हाट्यावर येउ नये म्हणून गावातील प्रतिष्ठितांनी समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यावर काही परिणाम पडला नाही. शुक्रवारी (ता. २२) सकाळी रागाच्या भरात या महिलेनी आपल्या दोन वर्षाच्या बालकाला घेऊन बोंढारला लागुनच असलेल्या महामार्गावर आली. यावेळी हैद्राबादकडे जाणाऱ्या धावत्या कन्टेनरखाली (आरजे-९- जीबी-३८५०) फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कन्टेनर चालकाचा ताबा सुटला. त्याने ब्रेक जाग्यावरच लावल्याने कन्टेनर रस्त्याच्या कडेला पलटला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

निर्दयी मातेला पोलिस कोठडी

यानंतर नांदेड ग्रामिण पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत दशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. या प्रकरणाची माहिती घेतली असता पोलिस ही चक्रावून गेले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर महिलेस ताब्यात घेतले. यावेळी तिने पोलिसाना सांगितले की, माझे बोंढार येथील व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत. त्याला व मला गावकऱ्यांनी विनाकारण मारले. याचा राग मनात धरुन मी माझ्या पोटच्या गोळ्याला ट्रकखाली फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणी सदर महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यांत तिच्यासह काही मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गोविंद खैरे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com