भोकरचा सहायक पोलिस उपनिरीक्षक पोलिसांच्या जाळ्यात

प्रमोद चौधरी
Tuesday, 29 September 2020

लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक नागोराव गोविंद अतराम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार भोकर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : भोकर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी १५ हजार हरुपयांची लाच मागणाऱ्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला असून, त्याच्यावर भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भोकर येथील एका तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यात म्हटले होते की, भोकर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत मिळवून देण्यासाठी भोकरचे सहायक पोलिस उपनिरीक्षक नागोराव गोविंद अतराम यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी करत आहेत. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून नागोराव अतराम यांना रंगेहाथ पकडले.

हे वाचा - नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह

तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.२२ सप्टेंबर) लाच मागणीची पडताळणी पंचासमक्ष केली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक नागोराव गोविंद अतराम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार भोकर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश पुरी करत आहेत. ही कार्यवाही पोलिस अधिक्षक कल्पना बारावकर, अपर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखारी पोलिस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेट्टे, एकनाथ गंगातीर, दर्शन यादव, अनिल कदम यांनी केली.

येथे क्लिक करा - Video - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस

पैनगंगा नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह
नांदेड ः
उमरखेड तालुक्याच्या बाजुस असलेल्या सहस्त्रकुंड पैनगंगा नदीपात्रात सोमवारी सकाळी अनोळखी मृतदेह नदी पात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मराठवाडा विदर्भ सिमेवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदी पात्रावर आहे. सध्या इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहतो आहे. त्यामुळे पर्यटकांची तोबा गर्दी येथे होत आहे.

हे देखील वाचाच - भयानक वास्तव : पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू पळाला तीन किलोमीटर

दरम्यान रविवारी (ता.२७) दुपारी मराठवाड्यातील परोटी ग्रामस्थांनी नदीपात्रात मृतदेह वाहत असल्याची माहिती मुरली येथील पोलिस पाटलांना दिली. त्यानुसार बिटरगाव पोलिस ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्रीपर्यंत मृतदेहाचा शोध घेतला. परंतु, रात्री अंधार पडल्यामुळे सोमवारी (ता.२८) पुन्हा मोहिम सुरु केल्यानंतर सकाळी सात वाजता सहस्त्रकुंड धबधबापासून एक किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात सदर मृतदेह सापडला. बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officers Caught In The Trap Nanded News