esakal | सारखणीच्या कथीत गुटखा माफियांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची टाळाटाळ

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

सारखणीच्या कथीत गुटखा माफियांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची टाळाटाळ

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : प्रतिबंधित गुटख्याचे संशयित वाहन तपासणीच्या कारणावरुन सिंदखेड पोलिस ठाण्यात गोंधळ घालून सारखणी येथील सराईत गुटखा तस्करांविरुद्ध पोलिसांवर दबाव टाकत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी( प्रा. कवाडे) चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी एका निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक यांना केली आहे.

माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिसांना मिळालेल्या गोपीनिय माहितीवरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके व त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांनी सारखणी व वाई बाजारच्या मध्यभागी असलेल्या अंजनखेड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर (ता. १८) एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एक (एम.एच.०४ सी.एम.८४६२) क्रमांकाच्या वाहनाला थांबून त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीला नेले जात आहे किंवा कसे याची खातरजमा केली. या घटनेने व्यथित झालेल्या सारखणी येथील असलम बनानी व इतर एक जणांने रात्रीच्या वेळेस सिंदखेड पोलिस ठाण्यात जाऊन राडा घातला होता.पोलिसांनीही पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याऱ्यांना चोप देऊन चांगलीच अद्दल घडविल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती. परंतु सिंदखेड पोलिसांनी वाहन तपासणी केल्याची नोंद दप्तरी करुन प्रकरण बंद केले होते.

हेही वाचा - व्यापारी जागा विकत घेण्यापेक्षा भाड्याने देण्यावर व घेण्यावर भर आहे. कारण नवीन आयटी व मॅन्युफॅक्चरिंग उद्योग येत आहेत.

तोच आता या प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले. समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध (ता. १८) रोजीच्या घटनेतील कारणावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंद करुन त्यांच्या गुटखा तस्करांनी सखोल चौकशी करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी (प्रा. कवाडे) नांदेडचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे यांनी (ता. २७) रोजी पोलिस अधीक्षकांना केली असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

एकंदरीत सारखणी येथील ‘त्या’गुटखा माफियांना पोलिस ठाण्यात गोंधळ घालने चांगलेच भोवणार आहे. सारखणी येथील ते गुटखा तस्कर कारवाईच्या धास्तीने व तसेच या प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांबरोबर नावलौकिक दोन नंबर व्यावसायिकांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटावे म्हणून याचना करत त्यांचे उंबरठे झिजवत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. शिवाय पीरिपी जिल्हाध्यक्षांच्या निवेदनावर पोलिस अधीक्षक नांदेड काय निर्णय घेतात याकडे माहूर किनवट तालुक्यातील कायदा प्रेमी नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे