esakal | राहत्या घरात गळफास घेऊन पोलिस नाईकाची आत्महत्या | Police
sakal

बोलून बातमी शोधा

 गळफास

नांदेड : राहत्या घरात गळफास घेऊन पोलिस नाईकाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माळाकोळी (ता. लोहा) येथील मुळरहिवासी तथा बिलोली तालुक्यातील रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चंद्रकांत माधवराव चाटे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळी माळाकोळी येथे उघडकीस आली.रामतीर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दिवंगत चंद्रकांत माधवराव चाटे यांनी माळाकोळी येथे त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या का केली असावी, याचे नेमके कारणही अद्याप समजले नाही.

हेही वाचा: Nanded : महापूर, अतिवृष्टीमुळे जगण अवघड झालंय

पोलिस नाईक दिवंगत चंद्रकांत चाटे यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळगावी माळाकोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, एक मुलगी व जावई असा परिवार आहे. चंद्रकांत चाटे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणूनही कर्तव्य बजावलेले आहेत. मधुकर चंद्रकांत चाटे यांनी दिलेल्या माहितीवरून माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

loading image
go to top