दिव्यांगांचे आजचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव

file photo
file photo
Updated on

नांदेड : बेरोजगार दिव्यांगांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी सोमवारी (ता. दोन) नोव्हेंबर रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी विद्रोही आंदोलनाची तसेच शासकीय अधिकाऱ्यांना रताळे व दिव्यांग साहित्य ज्यात काठ्या- लाठ्या, कुबड्या, अंध चष्मे भेट देणार असल्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे म्हटले होते. तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना ही निवेदन सादर केले होते. 

राहुल साळवे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला सर्वच दिव्यांग संघटणांनी जाहिर पाठिंबा देत शेकडोंच्या संख्येत सहभागी होणार असल्याचे निवेदन सादर केले. ता. नऊ आक्टोंबर ते १२ आक्टोंबर दरम्यान सर्वांना निवेदने देऊन ही स्थानिक जिल्हा प्रशासनाकडुन कुठलीच गंभीर दखल न घेता ता. २१ आक्टोंबर रोजी सर्व संबंधित विभागांना दिव्यांगांच्या मागण्या संदर्भात अत्यंत तातडीचे पत्र काढुन ता. २९ आक्टोंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु दरवेळेस प्रमाणे याही वेळेस जिल्हाभरातील दिव्यांगांची दिशाभूलच करण्यात आली. कारण संबंधित विभागांनी कोरोना या महामारीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या दिव्यांगांबाबत कुठलेच ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे जिल्हा भरातील शेकडो दिव्यांगांवर अशा संकट काळात ही अन्यायच करण्यात आला आहे.

शेकडो दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचीतच 

खरे पाहता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव निधी कोट्यवधी रूपये हा अखर्चीतच आहे तसेच प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्या विकास निधीतून ही दिव्यांगांसाठी निधी अखर्चितच आहे. दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ सुद्धा कागदावरच आहे. यासह ईतर सर्व शासन निर्णयांना सुद्धा केराचीच टोपली दाखविण्यात आली आहे. परीणामी शेकडो दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचीतच राहिलेला असतांना जिल्हा प्रशासनाकडुन अकलेचे तारे तोडत लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना न्याय मिळवू पाहणा-या राहुल साळवे यांच्यावर पोलिस प्रशासनाचा दबाव आणत रविवारी (ता. एक) नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास पोलिस  फौजफाट्यासह राहुल साळवे राहत असलेल्या विष्णुनगर, नांदेड येथील त्यांच्या घरी नोटिस घेऊन आले. राहुल साळवे यांचे वयोवृद्ध आई- वडील यांच्यावर दडपन आणत या नोटिसवर राहुलची सही आना अन्यथा आम्हाला तुमच्या मुलाला आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी ताब्यात  घ्यावे लागेल असे म्हणत तासभर वाद घातला. 

शिवाजीनगर पोलिसांची दबंगगीरी

राहुल साळवे यांची ६७ वर्षीय आई सौ. लिलावती सिताराम साळवे आणि ७६ वर्षीय वडिल सिताराम साळवे यांनी माझ्या मुलाला अटक केल्यास आम्ही दोघेही तुमच्याच पोलिस ठाण्यात येऊन आत्मदहन करणार असा टाहो फोडला. परंतु पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत राहुल साळवे यांच्याकडुन त्या आंदोलनापासून परावृत्त होण्याच्या नोटिसवर सहि घेतलीच. हा सर्व प्रकार रात्री एक ते दीड वाजेपर्यंत चालला. गल्लीतील सर्व लोक एकत्रीत येऊन साळवे यांच्या बाजुने ऊभे राहिले. राहुल साळवे पुढे म्हणाले की आजही लोकशाही जीवंत आहे जिल्हा प्रशासनाने किती हि जोर जबरदस्ती केली. तुरूंगात ही डांबले तरी सोमवारी (ता. दोन) नोव्हेंबर रोजीचे आमचे नियोजित विद्रोही आंदोलन होणारच असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com