esakal | सकारात्मक बातमी : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

कोरोनामुक्तीकडे नांदेड
सकारात्मक बातमी : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेडः कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली. त्याचा हळुहळु परिणाम दिसून येत असला तरी, बाधित आणि मृत्यूच्या संख्येत चढउतार होत आहे. मंगळवारी (ता.२७) प्राप्त झालेल्या अहवालात 29 कोरोना बाधितांचा मृत्यू, एक हजार चार संशयीतांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर जिल्हाभरातील एक हजार 364 बाधित कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.

मंगळवारी चार हजार 416 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन हजार 302 निगेटिव्ह, एक हजार चार जणांचे अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. जिल्हाभरात आतापर्यंत 77 हजार 932 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 63 हजार 782 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी 29 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरातील मृत्यूची संख्या एक हजार 483 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कोविड सेंटर व होम आयसोलेशनमध्ये 12 हजार 405 बाधितांवर औषधोपचार सुरु असून, त्यापैकी 249 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

हेही वाचा - ट्रकचालकांचे मोबाईल चोरी करणारा आरोपी गजाआड करुन त्याच्याकडून ३३ मोबाईलसह तीन लाख ८९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मंगळवार (ता. २७) देण्यात आली आहे.

मंगळवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - 177, ग्रामीण भागात - 785 व बाहेरील जिल्ह्यातील - 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी दोन पुरुष व दोन महिलांचा, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन पुरुष, सहा महिला, किनवट मध्‍ये एक पुरुष, मुखेड, हदगाव, लोहा, देगलूर येथे प्रत्येकी एक, गोदावरी, फिनिक्स कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी एक, व्हिजन रुग्णालायात तीन, साईकृपा, तिरमला, अपेक्षा, डेल्टा, निर्भाया, श्री गणेश रुग्णालयात प्रत्येक एक असे एकूण 29 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नांदेड कोरोना मीटर ः

एकूण बाधित रुग्ण ः 77 हजार 932

एकूण बरे झालेली संख्या ः 63 हजार 782

एकूण मृत्यू ः एक हजार 483

मंगळवारी कोरोनाबाधित ःएक हजार चार

मंगळवारी बरे झालेली रुग्ण ः एक हजार 364

मंगळवारी मृत्यू ः 29

उपचार सुरू ः 12 हजार 405

अतिगंभीर रुग्णांची संख्या ः 249

संपादन- प्रल्हाद कांबळे