
हिमायतनगर : तालुक्यातील सिरपल्ली गावाला पैनगंगेच्या पुराच्या पाण्याचा वेढा कायम असून, गुरुवारी (ता. २१) महसूल आणि आरोग्य विभागाच्या पथकाने धाडस दाखवत बोटीच्या सहाय्याने वैष्णवी अनिल तिरमलदार (रा. शिरपल्ली, ता. हिमायतनगर) या गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.