बिलोली येथील बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ नांदेडात 21 रोजी महामोर्चा

file photo
file photo

नांदेड : बिलोली येथील साठेनगरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय मूकबधीर, अनाथ मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ता. 9 डिसेंबर रोजी हा अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला. बिलोली तालुक्यात मागील काही वर्षात आपल्या महिला, मुलींवरील अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. यापूर्वीच्या प्रकरणातही मोर्चे काढले. आता परत या दुर्दैवी घटनेमुळे मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.

सरकारचा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचा वचक या अत्याचारी नराधमांवर राहिला नसल्याचे या वारंवार घडणाऱ्या घटनांमधून दिसून येत आहे. सरकार आणि या यंत्रणांचा पाठिंबा नेमका या गुन्हेगारांना आहे की न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या आंदोलकांना आहे, असा प्रश्न निर्माण करणारी वाईट परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

एफआयआरमध्ये संशयिताचे नाव देखील संशयास्पद

सदरील मुकबधिर मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना शोधून काढण्याच्या व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीतही बिलोली पोलिसांनी अत्यंत संशयास्पद भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. पिडितेचा खून झालेल्या ठिकाणी मोठमोठ्या दगडाचा खच पडलेला होता. अत्यंत भक्कम परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असताना प्रकरणाचा तपासच योग्य पध्दतीने सुरु केला नाही. एफआयआरमध्ये संशयिताचे नाव देखील संशयास्पद पध्दतीने नमूद केले आहे. यावरुन पोलीस बलात्काऱ्याला पाठिशी घालत आहे की काय, असा संशय निर्माण होत आहे. संशयित आरोपी म्हणून एकाला अटक करुन अत्यंत थातूरमातूर कारवाई केली आहे. पोलीस आणि सरकारची भूमिका जोपर्यंत गुन्हेगाराच्या विरुध्द आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूने तयार होणार नाही, तोपर्यंत असे प्रकार समाजात घडतच राहतील आणि त्याची झळ सर्वच समाजाला कोणत्या ना कोणत्या पध्दतीने सोसतच रहावी लागणार आहे.

याच्या निषेधार्थ सोमवार (ता. 21) डिसेंबर रोजी निषेध महामोर्चाच्या

माध्यमातून या गुन्हेगांराना अद्दल घडवण्यासाठी आणि झोपलेल्या शासन- प्रशासनाला जागं करण्यासाठी राज्यस्तरीय निषेध महामोर्चात सहभागी होऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडावे, असे कळकळीचे आवाहन निषेध महामोर्चाचे संयोजन समितीचे मारोती वाडेकर, सतीश कावडे, प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. राजू सोनसळे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्ज्वला पडलवार, रमेश मस्के, शाम कांबळे, दयानंद बसवंते, सुर्यकांत तादलापूरकर, प्रा. इरवंत सूर्यकार, ईश्वरअण्णा जाधव, माधव डोम्पले, सुग्रीव वाघमारे, सूर्यकांत शिंदे, रंजीत बाऱ्हाळीकर, परमेश्वर बंडेवार, यादव सूर्यवंशी, मालोजी वाघमारे, नागोराव आंबटवाड, प्रदीप वाघमारे, साहेबराव गुंडिले, शिवाजी नुरूंदे, भारत सरोदे, प्रवीण भालेराव, सुरेश वंजारे, उत्तम बाबळे, कॉ. नजीर शेख, अमर आईलवार, नितीन वाघमारे, महेंद्र भटलाडे, गणेश मोरे, बाळू लोंढे, आनंद वंजारे, संदीप मोरे, बालाजी कल्याणकर, सरजू वाघमारे, अतीश ढगे, संतोष शिंदे, पिराजी गाडेकर, मारोती शिकारे, खांडेश्वर लिंगायत, राहुल तेलंग, संदीप भालेराव, बाबू घोणशेटवार, अप्पू वाघमारे, विलास जाधव, अमीत जाधव, नागेश तादलापूरकर, दिलीप कंधारे, पांडुरंग ढोके, विठ्ठल गायकवाड, पवन नवारे, सचिन आंबटवार, के. के. कांबळे, अरुण गारोळे, बाळू खोबरे, प्रसेनजीत मांजरमकर, संतोष पारधे, रमेश घोडजकर, बाळू मेकाले, प्रकाश दर्शने, भगवान सूर्यवंशी, शशिकांत तादलापूर, भगवान जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com