Accused arrested
नांदेड - पुणे शहरात खून करून फरारी झालेल्या दोघांच्या नांदेड ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी नांदेड ग्रामीण हद्दीतून ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. वाजेगाव परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपींचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली. संदीप रंगराव भुरके (वय-२८, रा. चिखलवाडी, ता. भोकर जि. नांदेड), ओमप्रकाश गणेश किरकन (वय-२४, रा. चिखलवाडी ता. भोकर, जि. नांदेड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.