esakal | खरीपाचे दु: ख विसरुन नांदेडमध्ये रब्बी पेरणीला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी तसेच परतीच्या जोरदार पावसाने साडेपाच लाख
हेक्टरवर खरिपासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे
शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

खरीपाचे दु: ख विसरुन नांदेडमध्ये रब्बी पेरणीला सुरवात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : यंदा जिल्ह्यातील प्रकल्पात असलेला उपयुक्त पाणीसाठा तसेच जमिनीतील ओलावा यामुळे शेतकरी रब्बी पेरणीकडे वळले आहेत. जिल्ह्यात सध्या हरभरा, रब्बी ज्वारी व करडीची पेरणी होत आहे. गहू पेरणीला अवधी असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी तसेच परतीच्या जोरदार पावसाने साडेपाच लाख
हेक्टरवर खरिपासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे
शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असे असलेतरी रब्बी हंगाम मात्र जोरात
येण्याची शक्यता आहे. कृषी विभागानेही रब्बीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच
खताचे नियोजन केले आहे. खरीपात पावसामुळे झालेले नुकसान भरुन निघावे
यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र यावर्षी
वाढविण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले आहे. जिल्ह्यात हरभरा पिकाचे
सरासरी पेरणी क्षेत्र ६१ हजार हेक्टर आहे. परंतु यंदा तीन लाख हेक्टरवर
हरभरा पेरला जाइल असे नियोजन केले आहे. तसेच करडीचेही क्षेत्र वाढले असा
अंदाज आहे. कृषी विभागाकडून हरभरा, करडी तसेच रब्बी ज्वारी पिकाचे
अनुदानीत बियाणे वाटप केले आहे. प्रमाणित बियाणेही सवलतीच्या दरात उपलब्ध
झाले आहे.

हेही वाचाचिमुकल्यांच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे, खेळण्याच्या वयातच अंगमोड मेहनत -

या तालुक्यात रब्बी पेरणीला सुरवात

जिल्ह्यात नांदेड, नायगाव, अर्धापूर, मुदखेड, उमरी, बिलोली,
देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव या तालुक्यात रब्बी पेरणीला सुरवात
झाली आहे. देगलूर तालुक्यात शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने हरभरा पेरणी
करत आहेत. तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना बिज
प्रक्रिया करुन पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. कृषी सहायक राजू
सोनकांबळे यांनी करडी तसेच हरभरा बियाण्याला बिज प्रक्रिया करण्याचे
प्रात्याक्षीक शेतकऱ्यांना करुन दाखविले.

जिल्ह्यात रब्बीसाठी पूर्व मशागत झालेल्या ठिकाणी पेरणीला सुरवात झाली
आहे. यंदा हरभरा, करडी, रब्बी ज्वारी तसेच गव्हाचे क्षेत्र वाढण्याची
शक्यता आहे.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. नांदेड.