esakal | आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका | Radhakrishna Vikhe In Nanded
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 congress objection radha krishna vikhe patil nomination shirdi

आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

माहूर (जि.नांदेड) : मदिरालय सुरु झाली होती. पण मंदिरे सुरु होत नव्हती. शेवटी भाविकांना व भाजपला राज्यभर आंदोलन करावी लागली होती. आज सर्व मंदिरे खुले होत आहेत. त्याचा आनंद आहे. परमेश्वर व देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की, कोरोना कायम स्वरुपी संपुष्टात आला पाहिजे. या आघाडी सरकारला सुबुद्धी देवो. भविष्यकाळात चुकीचे निर्णय घेऊ नये, असे मत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी व्यक्त केले. आज गुरुवारी (ता.सात) माहूरला (Mahur) आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विखे म्हणाले, की आज राज्यात अतिवृष्टी, पुराचे मोठे संकट (Nanded) शेतकऱ्यांवर आहेत. कुठल्याही प्रकारची मदत होताना दिसत नाही.

हेही वाचा: चिमुकल्यांचा खेळताना झाला घात, दोघा सख्खा भावांसह तिघांचा..

वेळकाढूपणा चालू आहे. केंद्राकडे फक्त बोट दाखवण्याचे काम सुरु आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, कर्जमाफ करावेत. बऱ्याच ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यासाठी जो काही खर्च करावा लागेल, तो राज्य सरकारने करावा, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.

loading image
go to top