esakal | नांदेडच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ९७ हजार ८७० रुपयाचा ऐवज जप्त केला.

नांदेडच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराच्या भगतसिंग रोडवर सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर कारवाई करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ९७ हजार ८७० रुपयाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई वजिराबाद पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सोमवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास केली. 

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन भगतसिंग रोडवर असलेल्या सुरजीतसिंग माली यांच्या घरात जुगार अड्डा सुरू आहे. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

यावरून श्री. पुंगळे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन अधिकचे कुमक बोलावून सुरजीतसिंग माली यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी तेजूसिंग सतनामसिंग हुंदल, गुरमीतसिंग अमरजीतसिंग गील यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी ९७ हजार ८७० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. या सर्वांवर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. टोणगे करत आहेत. 

हेही वाचाकंटेन्टमेंट झोन जाहीर करताना द्यावे लागणार लक्ष...

इतवारामध्ये झन्ना- मन्ना जुगारावर छापा

नांदेड : इतवारा परिसरातील संघसेननगर भागात सुरू असलेल्या झन्ना- मन्ना जुगारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा साडेसहा हजाराचा ऐवज जप्त केला. 

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संघसेननर भागात इतवारा पोलिस ठाण्याचे हवालदार हबीब जबार चाऊस हे आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी (ता. १५) दुपारी तिनच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी संघसेननगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर जुगार सुरू होता. पोलिसांनी या अड्ड्यावरून सदाम हुसेन महमद अमीन, शेख अमजत शेख निझाम, शेख सोहेल शेख मोहसीन आणि शेख निसार शेख नबी यांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा हजाराचा ऐवज जप्त केला. हबीब चास यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात वरील जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक शकील करत आहेत. 
 

loading image
go to top