

Sambhajinagar–Parbhani Railway Line to be Doubled; Land Acquisition Process Begins
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू असून, या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या नोटिसा संबंधित जमीनधारकांना देण्यात येत असल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता २०२६ या नवीन वर्षात गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.