Video : वा रे पट्ठ्या..! ‘रेल्वे मोपेड ट्रॉली’ला लावले दुचाकीचे इंजिन

प्रल्हाद हिवराळे
Saturday, 20 June 2020


‘पुत्र असावे ऐसा की त्यांचा त्रिलोके लागावे झेंडा’ या म्हणी प्रमाणे काहीतरी वेगळे करून दाखविणारा जिद्य व मेहनत असणारा उमरी शहरातील तरूण शेख शकिल (रा.इस्लामपूर) व्यंकटेश नगर, उमरी याने कुठलीच डिप्लोमा व डिग्री नाही. अशा वेळी कमी शिक्षण असलेला तो तरूण शहरात गोरठा टी-पॉईंटवर मोटारसायकल पंम्चरचे छोटेशे दुकान टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. त्याला वाटले आपण रेल्वे रुळावरून धावणारी ‘लॅडिस’ तयार करुन पहावे म्हणून भंगारातील मोटारसायकलच्या इंजिनचा उपयोग करीत चार ते पाच व्यक्ती बसून धावणारे छोटसे लॅडीस बनवले आहे.

उमरी, (जि. नांदेड) : येथील नवयुवक मेकॅनिक तरूणाने रेल्वे पटरीवर धावणारी ‘रेल मोपेड ट्रॉली’ बनवल्याने मेकॅनिक शेख शकील छोटूमियाँ यांचे उमरी शहर व रेल्वे विभागाकडून कौतूक केले जात आहे.

पुत्र असावे ऐसा की त्यांचा त्रिलोके लागावे झेंडा’ या म्हणी प्रमाणे काहीतरी वेगळे करून दाखविणारा जिद्य व मेहनत असणारा उमरी शहरातील तरूण शेख शकिल (रा.इस्लामपूर) व्यंकटेश नगर, उमरी याने कुठलीच डिप्लोमा व डिग्री नाही. अशा वेळी कमी शिक्षण असलेला तो तरूण शहरात गोरठा टी-पॉईंटवर मोटारसायकल पंम्चरचे छोटेशे दुकान टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. त्याला वाटले आपण रेल्वे रुळावरून धावणारी ‘लॅडिस’ तयार करुन पहावे म्हणून भंगारातील मोटारसायकलच्या इंजिनचा उपयोग करीत चार ते पाच व्यक्ती बसून धावणारे छोटसे लॅडीस बनवले आहे.

हेही वाचा -  खळबळ : वाळू माफियांचा पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला, एक गंभीर

रेल्वे पटरीवर धावण्याचे प्रात्यक्षिक दाखविले
रेल्वे विभागातील मोठे अधिकारी व कर्मचारी रेल्वे पटरीवर काम करताना तसेच इतर कामे पाहण्यासाठी अशाच लॅडीसचा उपयोग करतात. आपण पाहतोच त्याच व तशाच स्वरूपाचे इंजीनवर धावणारे ‘रेल मोपेड ट्रॉली’ शेख शकील यांनी बनवून रेल्वे कर्मचाऱ्यांना घेवून शुक्रवारी (ता.१९) जुलै रोजी रेल्वे पटरीवर धावण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडतो त्याच प्रमाणे त्याने स्वतःचे व आई वडीलांचे तसेच उमरी तालुक्याचे नाव रोशन केले आहे. शेख शकील यांच्या जिद, मेहनतीला उमरीकर सलाम करीत अनेक अधिकारी, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी त्यांचे कौतुक करीत आहे. उमरी रेल्वे विभागाने त्याचे प्रात्यक्षिकरण पाहून दंग झाले आहेत. आणी त्यांनी शेख शकील यांना रोख पंधरा हजार रुपये बक्षीस दिले आहे. 

या वेळी शकीलच्या कार्याचे रेल्वे विभागातील चंदन कुमार, ट्रॉली मॅन माधव कांबळे, मारूती पवार, गुरूदेव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

नावा प्रमाणे लावली शक्कल 
शकीलच्या या कामाची सिंकीद्राबाद व नांदेड रेल्वे डिव्हीजन डी.एम.आर यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. शेख शकील यांना मेकॉनिकपणाचा छंद होता. असे अनेक मेकॅनीक शहरात आहेत. पण शकीलने नावा प्रमाणे आपली शक्कल लढवून सुशिक्षीत बेकार म्हणणाऱ्या युवकापुढे एक आर्दश ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Moped Trolley Is Fitted With A Two-Wheeler Engine, Nanded News