नांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत

शिवचरण वावळे
Wednesday, 30 September 2020

कोरोनाने मोठ मोठ्या उद्योग व्यवसायाचे कंबर्डे मोडले आहे. त्यात खादी ग्रामोद्योगाला देखील तीन कोटी रुपयाची झळ बसली आहे. त्यामुळे कामगारांचे पगार थकले आहेत. कामगारांना कुटुंब चालविण्यासाठी सहा महिण्यापासून केवळ चार हजार रुपये उचल देऊन कामे करावी लागत आहेत. खादीच्या प्रेमापोट पोटाला पिळ देऊन काम करणाऱ्या कामगारांचा सरकारने अंत पाहुनये अशी कळकशीची विनंती ईश्र्वरराव भोसीकर यांनी सरकार कडे केली आहे. 

नांदेड ः कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे खादीला तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अशा विपरीत परिस्थितीत देखील खादीप्रेमींसाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ता. दोन आक्टोंबरपासून खादीच्या सर्व कपड्यांवर २० टक्के सवलत देण्याचे धाडस केले आहे. खादीला आजही सरकारच्या मदतीची नितांत गरज असल्याचे मत खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्र्वरराव भोसीकर यांनी व्यक्त केले. 

खादी ग्रामोद्योग समिती कार्यालयात बुधवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत श्री. भोसीकर यांनी माहिती दिली. या प्रसंगी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे महाव्यवस्थापक बापू किनगावकर, श्री. मठपती यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. इतर राज्यातील सरकारकडून खादीवस्त्रास अनुदान दिले जाते.

 हेही वाचा- दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू ​

खादी ग्रामोद्योगास पाठबळ मिळत नाही

राज्यात सहा महिन्यापर्यंत खादीच्या वस्त्र खरेदीवर सवलत दिली जाते. महाराष्ट्रात मात्र सरकारकडून निराशा होत असल्याने खादीप्रेमींना वस्त्र खरेदीवर सवलत देण्याची कितीही इच्छा असली तरी, त्यासाठी अनेकवेळा विचार करावा लागतो. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार त्यांच्याकडून खादी ग्रामोद्योगास म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही. त्यामुळे खादी ग्रामोद्योग अडचणीतून जात असल्याने माजी आमदार तथा मराठवाडा सचिव श्री. भोसीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : परतीच्या पावसामुळे रानमेवा असलेले सिताफळ बेचव ​

खादीला वाईट दिवस

श्री. भोसीकर म्हणाले की, केवळ महात्मा गांधींची खादी म्हणून अतिशय तुटपुंज्या पगारीवर अतिशय निष्ठेनी अनेकजण काम करतात. त्यांच्यामुळे खादी बाजारात टिकुन आहे. लॉकडाउन काळात कामगारांनी अतिशय कमी पगारावर काम करुन दाखवले आहे. भविष्यात सरकारची खादी विषयी भूमिका अशीच राहिल्यास खादीला वाईट दिवस येतील. परंतु सरकारने कितीही दुर्लक्ष केले, तरी मराठवाडा खादी ग्रामोद्योग कधीच बंद पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

खादीवर २० टक्के सवलत 

महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ते दिवाळीपर्यंत खादीवर सुट दिला जाणार असून, यामध्ये सूती, रेशीम, पॉलीवस्त्र, उलन वस्त्र व ग्रामोद्योगनिर्मित सर्व वस्तूवर ता. दोन आक्टोबर ते ता. १६ नोव्हेबर दरम्यान २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain of announcements on khadi, no help from government - Ishwarrao Bhosikar's grief Nanded News