
हिमायतनगर : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली असून पेरणी केलेल्या बिजांकूरांना पावसाची साथसंगत अत्यावश्यक असताना गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नाही. परीणामी पेरलेले बीयाणे उन्हाच्या तिव्रतेने कोमेजून जाण्याची शक्यता असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
या वर्षीच्या पाऊसकाळ्यात रोहिण्या उघड्या गेल्या. आणि मृग नक्षत्र अर्ध्याहून अधिक कोरडे गेले. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असतानाच मान्सून दाखल झाला. अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.
आता मोसमी पाऊस झाल्याने यापुढेही पाऊस कायम राहत खरिपाच्या पेरणीला पोषक असा बरसेल. असा कयास बांधून शेतकऱ्यांनी चाड्यावर मुठ धरली होती. जिरायत शेतीमध्ये कपाशी तूर, मूग, उडीद हायब्रिड ज्वारी व अन्य कडधान्य पिकांची पेरणी केली.
काही वर्षांपासून कपाशीला बोंड अळीचे ग्रहन लागले असल्याने उतारा सातत्याने घटत चालला असून उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत असल्याचा प्रत्यय येत असल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पीक सोयाबीन कडे वळला आहे.
सोयाबीनचा पेरा या भागात नंबर एकला असून कपाशीच्या लागवडीत मोठी घट झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी पावसा अभावी लांबत चाललेल्या पेरणीला सुरूवात केली असून या भागात जवळपास ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने अखंडपणे उघडीप दिली असल्याने पेरणी केलेले बी, बियाणे जमिनीत कोमेजून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. पहिलीच पेरणी मोठ्या तडजोडी अंती पुर्ण केली. आणी पेरलेले बी बियाणे नुकसानीत गेले तर दुबार पेरणीसाठी बी बियाणे कुठून आणावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. असा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी, गेल्या वर्षीची अतिवृष्टी सोडली तर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अवर्षण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत असून शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.