नांदेड ब्रेकींग : दूर्मीळ खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

फोटो
फोटो

बिलोली (जिल्हा नांदेड) : दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सात आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी. कोळी यांनी दिली.

जंगलातील दुर्मिळ प्राणी असलेल्या दोन खवल्या मांजराची परराज्यातून तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यासाठी भोकर, बोधडी, हदगाव येथील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिलोली शहरातच या आंतरराज्य तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये आरोपी रवींद्र संतोष स्वामी, रतन भिवाजी हणवते, सुनील साहेबराव वायकोळे, फकीर माहेबूब शेख, तोहीतपाशा शेख इस्माईल, तकियोद्दीन खैरोद्दीन खतीब, मुजिगोद्दीन खैरोद्दीन खतीब या सात आरोपीविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ५१ नुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देगलूर विभागाचे जी. एल. कोळी यांनी दिली.

वन विभागाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

नांदेडचे उप वनरक्षक आशिष ठाकरे, साह्ययक वनरक्षक डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे, इस्लापुरचे आरएफओ श्री शिंदे, हदगावचे आरएफओ श्री रुद्रावार, बोधडीचे आरएफओ श्री जाधव यांच्या पथकाने रात्रभर आपल्या डोळयात अंजन घालून करून फिल्मी स्टाईल या टोळीचा पाठलाग करून त्यांना खवल्या मांजरासह पकडले. यावेळी भोकर, इस्लापुर, बोधडी, हदगाव व देगलूर विभागातील वनपाल, वनरक्षकांचा या पथकात समावेश होता. सदरली गुन्ह्याचा तपास देगलूर विभागाचे आरएफओ जी. एल. कोळी यांच्याकडे दिला आहे.

खवल्या मांजर तस्करीचे बिलोलीपर्यंत जाळे

सदरील तस्करीमधील अती दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या खवल्या मांजर अनुसूचि न.१ मधला प्राणी म्हणून गणल्या जातो. आणि आंतराष्ट्रीय काळया बाजारपेठेत एका मांजराची किंमत ७० ते ८० लाख असल्याचे समजते. खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे कनेक्शन बिलोलीत एक महामंडळाच्या चालकाप्रयन्त असल्याने एकच खळबळ उडाली आहे. खवल्या मांजराच्या तस्करावर कारवाई करण्याची या विभागात पहिलीच वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com