esakal | माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस; बघ्यांची गर्दी

बोलून बातमी शोधा

file photo}

मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील माळरानात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून पिवळा पळस फुललेल्याची ही दुर्मिळ घटना चर्चेचा विषय बनली आहे.

माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस; बघ्यांची गर्दी
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : रंगपंचमी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना लाल- केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाडे नजरेस पडताच निसर्ग सौंदर्याच्या घटनाक्रमाचा आकर्षण मनाला प्रसन्न करून जातं. लाल- केसरी पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील माळरानात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून पिवळा पळस फुललेल्याची ही दुर्मिळ घटना चर्चेचा विषय बनली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगात जैवविविधतेने नटलेल्या माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील माळरानात नेहमी दुर्मिळ जीव व वनस्पती आढळतात. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुलले दिसते. केशरी, लाल व शेंद्री रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची रान झाडे. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. वसंत ऋतू आला की, पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल- शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. लाल- शेंद्री रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळते झुपकेदार फुलांसाठी प्रसिद्ध हे पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे.

मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. या दुर्मिळ वनस्पतीला कुतूहलाने पाहले जात आहे. पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. पिवळ्या पळसाबद्दल एक अंधश्रद्धा अशी देखील आहे की, त्याच्या पिवळ्या फुलांचा उपयोग गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो. ही जरी अंधश्रद्धा असली तरी या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. पिवळ्या पळसाबद्दल वनस्पती शास्त्रज्ञांचे असे मत आहे. की हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे. यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. ऐरवी लाल, केशरी- भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा अलगिलिझमचाच प्रकार आहे. अतिशय दुर्मीळ व औषधीसाठी अनन्यसाधारण महत्व असणार्‍या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत करण्यात आलेल्या जैवविविधता सर्वेक्षणात या वनस्पतीची कुठेही नोंद असल्याची माहिती नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे