esakal | Video - माहूरगडाप्रमाणेच माता रत्नेश्वरीही नांदेड जिल्ह्याचे आराध्य दैवत  
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

माहूरच्या रेणुकादेवी पाठोपाठच जिल्ह्यातील वडेपुरी (ता.लोहा) येथील माता रत्नेश्वरी देवी देखील नांदेड जिल्ह्याचे आराध्य दैवत आहे. पायी दिंडी हे नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. परंतु, यंदा कोरोनामुळे भाविकांविनाच नवरात्रोत्सव साजरा होत आहे.

Video - माहूरगडाप्रमाणेच माता रत्नेश्वरीही नांदेड जिल्ह्याचे आराध्य दैवत  

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना महामारीमुळे यंदा सर्व सण-उत्सवांवर परिणाम झालेला आहे. साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरे होत आहे. त्यातून नवरात्रोत्सवही सुटला नाही. शनिवारी सुरु झालेला नवरात्रोत्सव माहूरगडासह रत्नेश्वरीगडावर भाविकांविनाच साजरा होत आहे.

लोहा मार्गावर लोहा तालुक्‍यात वडेपुरी हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. कंधार आणि नांदेड या दोन ऐतिहासिक शहरांपासून जवळच असलेल्या वडेपुरीत रत्नेश्‍वरी देवीचे मंदिर आहे. मराठवाड्याच्या संदर्भात  इ. स. ११ ते १४ वे शतक या कालखंडाला सामान्यपणे यादव कालखंड म्हणतात. यादव राजाचा मंत्री हेमाद्री याच्या याच कालखंडात म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीच्या काळात रत्नेश्‍वरीच्या डोंगरावर यादव राजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नांदेड आणि कंधार येथील किल्लेही भुईकोट आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर नजर ठेवून राज्य अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने एक डोंगरी किल्ला असावा असा बहुधा विचार करून यादव राजांनी वडेपुरीपासून दोन किलोमीटर लांब असलेल्या या डोंगराची निवड केली.

हेही वाचा - आॅनलाईन शिक्षण : मुलांमध्ये वाढले कानाचे आजार

अशी आहे अख्यायिका
वडेपुरी गावात नारायण माळी हा शेतकरी व त्याची पत्नी लक्ष्मी दोघेही धार्मिक होते. देवीचे निस्सीम भक्त. माता रत्नेश्‍वरीने याच लक्ष्मी-नारायणाच्या पोटी जन्म घ्यायचे ठरवले. लक्ष्मीला अत्यंत तेजस्वी असे कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नामकरण रत्ना असे करण्यात आले. यथावकाश तिचे शंभुनाथ नावाच्या व्यक्तीसोबत लग्न लागले. लग्नानंतर श्रावणात दर सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी रत्ना बाहेर पडे. एकदा भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या रत्नाचा पतीने पाठलाग सुरू केला. 

हे देखील वाचाच - रविवारी ९२ बाधितांची भर, १२१ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

एवढ्या अंधारात रत्ना एकटीच घराबाहेर अशी डोंगर-दऱ्यांत जाते याचा अर्थ ती सुंदर रूपातील हडळ आहे, असा समज करून पती शंभुनाथने तिच्यावर तलवारीचा वार करण्यासाठी तलवार बाहेर काढली. रत्नाला हे कळले आणि तिने ‘हे माते मला पोटात घे’ अशी विनवणी केली. शंभुनाथ रत्नाच्या जवळ आला, तिच्या मानेला धरून तिची मान छाटण्याचा पवित्रा त्याने घेतला. तेवढ्यात विजेचा एक प्रचंड लोळ खाली आला, त्याचा फक्त स्पर्श रत्नाच्या डोक्‍याला झाला आणि त्याबरोबर रत्नाचे एका शिळेत रूपांतर झाले. पुढे हीच रत्ना रत्नेश्‍वरी देवी म्हणून शिळेच्या रूपात प्रकट झाली. 

येथे क्लिक कराच - नांदेड : डोळ्याला भुरळ घालणाऱ्या ‘गुलतुर वृक्षां’ च्या फुलांची उधळण

हेमाडपंती पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविकांना नेहमीच आकर्षित करून घेते. नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा होतो. नांदेड-लोहा मार्गावर नांदेडपासून साधारण २० किलोमीटरवर डोंगरात रत्नेश्‍वरी देवीचे ठाणे आहे. मंदिराचा कारभार विश्‍वस्त मंडळाकडून चालतो. 

loading image
go to top