esakal | कम्युनिस्टचे भरपावसात निदर्शने कशासाठी ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची हत्या की आत्महत्या यावर चांगलेच राजकारण तापले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देखील यात उडी घेतली आहे. सुशांतसिंह प्रमाणेच डॉ. नरेन्द्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या मुख्य सुत्रधारांना अटक करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  

कम्युनिस्टचे भरपावसात निदर्शने कशासाठी ते वाचा...

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लॉकडाउन काळातील सर्व गरजूंना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शने करण्यात आली. 

या वेळी निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या कुटुंबास आयकर लागू नाही अशा सर्व कुटुंबांना साडेसात रुपये आर्थिक मदत करून प्रती व्यक्तीस दहा किलो धान्य पुरवठा करण्यात यावा. रेल्वे स्टेशनवरील कंत्राटी कामगारांचे पगारामधील लाखो रूपये हडप करणाऱ्या रेल्वे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. वाहन धारक व मायक्रो फायनान्स धारकांना एजन्ट व वसूली करण्याकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात आहे. केंद्राने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

हेही वाचा- राज्यातील २३६ महिला चालकांना कामावर परतण्याची आस

घरकाम करणाऱ्या महिलांना काम नाही

कोरोनामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. घरकाम करणाऱ्या महिला, मोढ्यात काम करणारे हमाल यांना आजही पूर्णवेळ काम मिळत नाही. त्यांच्या हाताला काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्‍न एरणीवर आहे. अशा स्थितीत सरकारने या अर्थिक दुर्लब घटकातील कुटुंबास लवकरात लवकर मदत करावी. 

हेही वाचा- नांदेडमधील एका लग्नाची अशीही गोष्ट, आरोप- प्रत्यारोपाने गाजली ​

जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलकडून आर्थिक लूट थांबवा

डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या मुख्य सुत्रधारांना अटक करा. नांदेड शहरातील व जिल्ह्यातील काही खाजगी हॉस्पिटलकडून कोरोना रूग्णांची आर्थिक लूट होत असल्या प्रकरणी अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. सर्व तक्रारी निकाली काढून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी  सेक्रेटर गंगाधर गायकवाड, उज्वला पडलवार, मारोती केंद्रे, अनुराधा परसोडे, दत्ता इंगळे, रविन्द्र जाधव, जयराज गायकवाड, इस्माईल खान, मीरा बहादूरे, अनसूया गोटमुखे, सिमा गजभारे, रब्बाना बी पठाण, पार्वती सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 

loading image
go to top