esakal | नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करा- महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरण व्यवस्थापक संघ
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करा- महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरण व्यवस्थापक संघ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून नाट्यगृह बंद होते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करून मार्गदर्शक तत्त्वानुसार नाट्यगृह पूर्ववत सुरू करण्यात आले.

नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करा- महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरण व्यवस्थापक संघ

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणच्या धर्तीवर नांदेड येथील नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक व्यवस्थापक संघाच्या वतीने कुसुम नाट्यगृह व्यवस्थापन, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व्यवस्थापन, मनपा महापौर मोहिनी येवनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून नाट्यगृह बंद होते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करून मार्गदर्शक तत्त्वानुसार नाट्यगृह पूर्ववत सुरू करण्यात आले. शासन नियमाप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश द्यावा लागणार आहे, त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे न परवडणारे झाले आहे. सांस्कृतिक कलेच्या जतन व संवर्धनासाठी नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करून नाट्यप्रयोगास सभागृह उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी  निवेदनाद्वारे डॉ. जुगलकिशोर धूत, प्रभाकर गादेवार, आबा ढोले, बालाजी बोडखे, सचिन आडे यांनी केली आहे.

हेही वाचा - नांदेड : पिस्तुलचा धाक दाखविणाऱ्या युवकास अटक, पिस्तुल जप्त, मुदखेड पोलिसांची कारवाई -

नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी केल्यास नाट्यप्रयोग लवकरात लवकर सादर करण्यास सहकार्य लाभणार असून असंख्य रसिकप्रेक्षकांना सांस्कृतिक मेजवानीचा लाभ मिळणार आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या असंख्य नाट्यकर्मी, कलाकार यांना पाठबळ मिळणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.