nanded langar event work
sakal
नांदेड
Nanded News : नांदेडला येणाऱ्यांसाठी दिलासा! दिल्ली, चंदीगड, मुंबईहून विशेष रेल्वे
‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येथे २४ व २५ जानेवारीला विशेष धार्मिक कार्यक्रम होणार.
नांदेड - ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येथे २४ व २५ जानेवारीला विशेष धार्मिक कार्यक्रम होणार असून देशभरातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (टीओडी) अंतर्गत दिल्ली, चंदीगड आणि मुंबई येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे.
