हुश्श ऽऽऽ...नांदेडकरांना दुसऱ्या दिवशी दिलासा

शिवचरण वावळे
Wednesday, 6 May 2020

बुधवार ५७ नमुने अहवाला पैकी सायंकाळी सहापर्यंत आलेल्या ५३ ‘स्वॅब’ चा नमुने अहवाला निगेटिव्ह आला. या व्यतिरिक्त मंगळवारी शहरातील घेण्यात आल्या २१ संशयितांचा व भोकर येथील नऊ व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाला आहे

नांदेड : पंजाबहून परतलेल्या चालकास कोरोनाची लागण झाल्याने नांदेड शहरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होते की काय? अशी भीती जिल्हा प्रशासनासह नांदेडकरांना वाटत होती. परंतु मागील दोन दिवसापासून शहरात एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

कोरोना बाधितांची बुधवारी (ता. सहा) सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक हजार ३८२ स्वॅब घेण्यात आले होते. एकूण घेण्यात आलेले स्वॅबपैकी एक हजार २९१ स्वॅब नमुने अहवाल निगेटिव्ह आले तर ३२ संशयितांच्या ‘स्वॅब’ नमुने अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत पाच स्वॅब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. यापैकी ३४ रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आहे. यातील तीन रुग्णांचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- जूनपूर्वीच का सतावतेय कामगारांना परिवाराची चिंता...

सर्व कोरोना बाधीतांची प्रकृती स्थिर

बुधवार ५७ नमुने अहवाला पैकी सायंकाळी सहापर्यंत आलेल्या ५३ ‘स्वॅब’ चा नमुने अहवाला निगेटिव्ह आला. या व्यतिरिक्त मंगळवारी शहरातील घेण्यात आल्या २१ संशयितांचा व भोकर येथील नऊ व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील कोरोना बाधीत रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी आणि पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा- लॉकडाउन नंतर बेरोजगारांना सावरण्याची संधी....कोण म्हणतय ते वाचा

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडुनका

जनतेने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

- आत्तापर्यंत एकूण संशयित - १५५१
- एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-१४१३
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - ४२८
- अजून निरीक्षणाखाली असलेले - १३५
- पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - १८२
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -१२३१
- आज तपासणीसाठी नमुने घेतले- २५
- एकुण नमुने तपासणी- १३८२
- एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ३४
- पैकी निगेटीव्ह - १२९१
- नमुने तपासणी अहवाल बाकी- ३२
- नाकारण्यात आलेले नमुने - पाच  
- अनिर्णित अहवाल -१९
- कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - तीन
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ९१ हजार ३७९ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relieve Nanded The Next Day Nanded News