
माहूर गडावरिल श्री रेणुकादेवीचे मंदीर भाविकांना दर्शनाकरिता सुरु करण्याकरिता गडावर जय्यत तयारी करण्यात येत आहे
माहूर ((जिल्हा नांदेड) :कोरोनाच्या महामारीमुळे माहूर गडावरिल श्री रेणुकादेवी मंदीरासह सर्व मंदीरे ता.१८ मार्चपासून बंद होती. शासनाच्या आदेशाने दिपावलीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सोमवारी (ता. १६) सकाळी मंदीर व सर्व धार्मीक स्थळ भाविकांना दर्शनाकरिता खुली करण्यात आली आहेत.
माहूर गडावरिल श्री रेणुकादेवीचे मंदीर भाविकांना दर्शनाकरिता सुरु करण्याकरिता गडावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदीर व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. दोन भाविकात सहा फुटाचे अंतर असणार आहे तसे मार्कीगंचे करण्याचे काम सुरू आहे. दर्शनबारीचा वापर होणार नाही. तिर्थ प्रसादाचे वाटप होणार नाही, भाविकांना मास्क अनिवार्य आहे. तसेच गर्भधारणा असलेली भगीनी, दहा वर्षा खालील बालके व ६५ वर्षा वरिल जेष्ठ नागरिकांना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही.
सोमवारी (ता. १६) मंदीर सकाळी अकरा वाजता उघडेल व सायंकाळी साडेआठ वाजता बंद होईल. उदयाचा दिवस वगळता ईतर सर्व दिवशी मंदीर सकाळी सहा वाजता उघडणार आहे अशी माहीती श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी दिली. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय काण्णव उपस्थित होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे