
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून विश्वासू कंत्राटदारामार्फत करण्यात आलेले छत शुक्रवारी सभापती श्री. रावणगावकर कामात व्यस्त असताना अचानक कोसळले. सुदैवाने सभापती श्री. रावणगावकर यांना इजा झाली नाही.
डागडूजी केलेले छत सभापतींच्या समक्ष कोसळले, कोठे ते वाचा...
नांदेड: जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर पाटील यांच्या कक्षाच्या छताची नुकतीच डागडूजी करण्यात आली होती. पदाधिकारी निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी साेईनुसार आपआपल्या कक्षामध्ये सोईनुसार फर्निचर, तात्पुरते बांधकाम, तात्पुरत्या फेरबदलासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरेसची आकर्षक कामे केली.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून विश्वासू कंत्राटदारामार्फत करण्यात आलेले छत शुक्रवारी सभापती श्री. रावणगावकर कामात व्यस्त असताना अचानक कोसळले. सुदैवाने सभापती श्री. रावणगावकर यांना इजा झाली नाही. मात्र, डागडूजीच्या नावाखाली दर्जाहीन कामे करून झोळी भरून घेणाऱ्या दोषी कंत्राटदारावर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या तीन मजली प्रशासकीय इमरातीची सव्वा कोटी खर्चुन डागडूजी करण्यात आली. इमारती अंतर्गत कमकुवत बांधकामामध्ये फेरबदलांसह ठिकठिकाणच्या गळती रोखण्यासाठी स्ट्रक्चरमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले. इमारत डागडूजीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढे जाऊन नुतन पदाधिकारी नव्या जोमाने निजी कक्षापासूनच कामाला लागले. दरम्यान निजी कक्षातील फर्निचर, प्लॅस्टर ऑफ पॅरेसच्या आकर्षक कामासाठी स्वनिधीतून तरतुद करण्यात आली.
हेही वाचा- धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४८ वर
सभापतींच्या निजी कक्षांची डागडूजी म्हटल्यावर प्रशासनाने मागणीनुसार निधी मंजुर केला. पण अंतर्गत कामासाठी बांधकाम विभागाने विश्वासू कंत्राटदाराची निवड करून कक्षाची डागडूजी करून घेतली. त्यानुसार कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या निजी कक्षाचे फर्निचर, प्लॅस्टर ऑफ पॅरेसचे आकर्षक छत, रंगकाम करण्यात आले. पदाधिकारी निवडीनंतर पंधरवडा डागडूजीच्या कामातच गेला, त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच दर्जाहीन कामाचे पितळ उघडे पडू लागले.
बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे खास विश्वासू कंत्राटदाराने मर्जीनुसार बांधकामासाठी निकृष्ठ साहित्याचा वापर करून सभापती कक्षास बेगडी आकर्षणद्वारे झळाळी दिली. बांधकाम विभागाकडून ठरलेल्या कंत्राटदारांची झोळी भरत आहे. टक्क्यांच्या झोलामध्ये कामाचा दर्जाबाबत चुप्पी साधण्यात येत असल्याने अवघ्या चार महिन्यात डागडूजीच्या कामात दर्जाचे पितळ उघडे पडले.
येथे क्लिक करा- अखेर नांदेडमधील केशकर्तनालये सुरू
सभापती श्री. रावणगावकर शुक्रवारी (ता. २६) कक्षामध्ये असताना अचानक छताचा काही भाग कोसळला. दरम्यान कसल्याही प्रकारची आदळ आपट नसताना छताचा भाग कोसळल्यामुळे सर्वत्र एकच धावपळ उडाली. सुदैवाने सभापती श्री. रावणगावकर यांना इजा झाली नाही मात्र, दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारावर प्रशासन कारवाइ करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Web Title: Repaired Roof Collapsed Front Speakers Read Wherenanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..