esakal | आनंदवार्ता : कोट्याहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटीव्ह  
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नांदेड जिल्ह्यातील ४८ व हिंगोली जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश होता. दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वग्रही परत आणण्‍यासाठी जळगाव बस डेपोतून तीन बस रवाना झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी कोटा येथून फक्त २४ विद्यार्थीच परतले

आनंदवार्ता : कोट्याहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटीव्ह  

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी राजस्थान (कोटा) येथे शिक्षणासाठी गेले होते. अचानक लॉकडाउनची घोषणा झाल्याने हे विद्यार्थी महिनाभरापासून कोटा येथेच अडकुन पडले होते. त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी राज्य सरकारने ७० पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करुन त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले. यात नांदेड जिल्ह्यातील ४८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

नांदेड जिल्ह्यातील ४८ व हिंगोली जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश होता. दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वग्रही परत आणण्‍यासाठी जळगाव बस डेपोतून तीन बस रवाना झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी कोटा येथून फक्त २४ विद्यार्थीच परतले. अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी अविनाश कचरे यांनी दिली. 

हेही वाच- नांदेडकर चिंताग्रस्त : ‘ते’ चार पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ताच

२४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह​

शुक्रवारी (ता.एक) रात्री उशिरा हे विद्यार्थी शहरात परतले होते. रात्री उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन शनिवारी (ता.दोन) त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारुन घरी सोडण्यात आले होते. या २४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

राजस्थान राज्यातील कोटा येथे आय.आय.टी, जेईई व अन्य उच्च शिक्षणासाठी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी गेले होते. लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून ते तेथेच अडकून पडले. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थी परतू लागले आहेत. 

नांदेडला परतल्यानंतर खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांना शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील कै. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक भवनात थांबविण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता त्यांचा अहवाल रविवारी रात्री निगेटिव्ह आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आणखी चार विद्यार्थ्यांचा अहवाल येणे बाकी असून, संध्याकाळपर्यंत संबंधित चारही अहवाल प्राप्त होईल असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.  

हेही वाचा- पालकांनी काळानुरूप बदलायला पाहिजे, कशासाठी? ते वाचाच

बाधीतांची संख्या ३१, तिघांचा मृत्यू

नांदेड शहरात कोरोना बाधीतांची संख्या ३१ असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघांपैकी एक महिला सेलू (परभणी), एक महिला नांदेडच्या रहेमतनगर व एक वृद्ध पीर बुऱ्हाणनगर येथील रहिवाशी आहे. उपचार सुरू असलेल्या २८ बाधीतांमध्ये लंगर साहिब गुरुद्वाराचे २० कर्मचारी आहेत. उर्वरित ८ जणांमध्ये दोन जण गुरुद्वारा परिसरातील आहे.  यात्रेकरूंना सोडून पंजाब येथून परतलेले पाच वाहन चालक व एका मदतनीसाचा समावेश आहे.