निवघा बाजार : नातेवाइकाचे निधन झाल्याने पत्नीला त्यांच्या गावी सोडून मूळगावी शिरड (ता.हदगाव) कडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. .यात तरुण जागीच ठार झाला. ही घटना बरडशेवाळा येथील पुलावर सोमवारी (ता. ७) रात्री ८:३० वाजता घडली. गजानन राऊत (वय २८, शिरड, ता.हदगाव) असे मृताचे नाव आहे. गजानहा दुचाकीवरून पत्नीला घेऊन परभणी येथे गेला होता..Child Marriage : खेळण्याच्या वयात संसार कसा करू? नांदेड जिल्ह्यात १८ महिन्यांत यंत्रणेने रोखले ८४ बालविवाह.पत्नीला नातेवाईकाकडे सोडून तो परभणी शिरडकडे येत होता. बरडशेवाळा येथील पुलावर दुचाकी धडकल्याने डोक्याला जब्बर मार लागला. नागरिकांनी रुग्णालयात हलविल्यानंतर डाॅक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. गजाननच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.