
रामेश्वर काकडे
नांदेड : सातत्याने हाताला काम मिळेल, अशा मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा अद्यापही जिल्ह्यातील युवा वर्गाला असून, जिल्ह्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज वाढतच होत आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४० हजार बेरोजगारांनी कौशल्य विकास केंद्राकडे नोंदणी करत नोकरीची मागणी केली आहे.