esakal | पंधरा वर्षांपासून रखडलेला रस्ता मोकळा; प्रशासनाचा पुढाकार शेतकऱ्याला आधार

बोलून बातमी शोधा

The road that has been blocked for fifteen years in Kurula has been cleared.jpg}

कुरुळा येथून जवळच असलेल्या हासुळ शिवारातील शेती गट क्रमांक २१९ व २२० मध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता कालांतराने बंद करण्यात आला होता.

पंधरा वर्षांपासून रखडलेला रस्ता मोकळा; प्रशासनाचा पुढाकार शेतकऱ्याला आधार
sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा (नांदेड) : ग्रामपातळीवर अनेक जटील समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते. अशा परिस्थितीत प्रशासनाची कसोटी लागते.  अनेकांना तोंड देत पुढाकार घ्यावाच लागतो. मागील १५ वर्षांपासून हासुळ शिवारात शेतीकडे जाण्यासाठीचा रस्ता न्यायाच्या प्रतीक्षेत होता. यासाठी कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे, महसूल पथक आणि पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून रस्ता मोकळा होऊन शेतकऱ्यांना आधार मिळाल्याने गावकऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

अर्धापुरात प्रशासनाने बालविवाह रोखला; वधू पित्याचे केले सामुपदेशन

कुरुळा येथून जवळच असलेल्या हासुळ शिवारातील शेती गट क्रमांक २१९ व २२० मध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता कालांतराने बंद करण्यात आला होता. नागोराव भोरगिर, सुमनबाई भोरगिर, आनंदा भोरगिर आणि शंकर भोरगिर यांनी या जागेतून जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव केला होता. यामुळे माणिकराव भोरगिर यांनी वर्षानुवर्ष प्रलंबित शेतरस्त्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनास विनंती केली होती. तत्कालीन तहसीलदार यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश काढले होते परंतु समस्या जैसे थे होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुन्हा नव्याने कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन (ता.१६) फेब्रुवारी रोजी आदेश काढत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश  दिले. दरम्यान तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी शेख, तलाठी ए आय अन्सारी, कुरुळा बिट जमादार सुभाष चोपडे, पोलिस कॉन्स्टेबल बालाजी केंद्रे यांनी जायमोक्यावर उपस्थित राहून वर्षानुवर्ष सतवणारा हा प्रश्न निकाली काढल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

शेतीत साधनांची ने आन करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वाढता वापर यामुळे शेतीसाठी रस्ते हे अपरिहार्य बनले आहेत. त्यातच वडिलोपार्जित शेतीकडे जाण्यासाठी विशिष्ट हद्दीपासून असणारे रस्ते कालांतराने वादविवादातून बंद होतात आणि ही शेतकऱ्यांची अडचण प्रशासनाची डोकेदुखी बनते. वेळप्रसंगी मॉबच्या विरोधात न्याय देने जिकरीचे असते. परंतु कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने हासुळवासीयांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.