esakal | अर्धापुरात प्रशासनाने बालविवाह रोखला; वधू पित्याचे केले सामुपदेशन

बोलून बातमी शोधा

Ardhapur taluka administration has succeeded in preventing child marriage of a minor girl.jpg}

एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा मुलीच्या पालकाने समुदेशनानंतर रद्द केला आहे.

अर्धापुरात प्रशासनाने बालविवाह रोखला; वधू पित्याचे केले सामुपदेशन
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (नांदेड) : जिल्हा व तालुका प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विवाह संबंधित सर्व संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना जिल्हाधिका-यांनी पत्र पाठवून बालविवाह न लावण्याचे सुचित केले आहे. याचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यात आला आहे. तालुक्यातील वाहेदपूर या गावातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा मुलीच्या पालकाने समुदेशनानंतर रद्द केला आहे.

नागपूर परीक्षा केंद्र गाठण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांची झाली धावाधाव

याबाबत प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, नांदेडचा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती मिळाली की, अर्धापूर तालुक्यातील मौजे वाहेदपूर वाडी या गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह शनिवारी (ता 27) आहे. या माहिती आधारे मुलीच्या काळजी व संरक्षण या दृष्टीने सदर बाल विवाह थांबविण्याकरिता सहकार्य करण्याबाबत नांदेडचे चाईल्ड लाईन संस्थेच्या वतीने तहसीलदार अर्धापूर यांना विनंती करण्यात आली. त्यावरून तहसीलदार सुजित नरहरे, गटविकास अधिकारी मीना रावतळे, बाल विकास अधिकारी मयुरी पुणे यांच्या समन्वयाने एक पथक गठित करण्यात आले व सदर प्रकरणी तात्काळ बाल विवाह प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्याबाबत पथकास सुचित करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या पथकातील प्रफुल्ल खंडागळे मंडळाधिकारी, सूनील गोखले विस्ताराधिकारी, पी एस मुंडकर विस्ताराधिकारी, नीता राजभोज व आशा सूर्यवंशी समुपदेशक, नामदेव लांडगे स्वयंसेवक यांनी मुलीच्या आई-वडिलांना बाल विवाहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 व सुधारित ता. 13 जुलै 2016 मधील कलम 10 व 11 अन्वये सदर विवाह कायद्यानुसार गुन्हा ठरतो असे समजावून सांगितले. मुलीचे वडील यांनी मुलीचे लग्न आता अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही असे पंचा समक्ष लिहून दिले व सदरील बालविवाह रद्द केला. यावेळी सरपंच शिल्पा कदम, तलाठी बालाजी माटे, ग्रामसेवक थोरात,अंगणवाडी सेविका रूक्‍मीनबाई गुंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.